Friday, May 3, 2024
Homeनगरदेवळाली प्रवरा पालिकेच्या उपनगराध्यक्षांचा राजीनामा मंजूर

देवळाली प्रवरा पालिकेच्या उपनगराध्यक्षांचा राजीनामा मंजूर

देवळाली प्रवरा (वार्ताहर) –

देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा लोकनियुक्त नगराध्यक्ष

- Advertisement -

सत्यजित कदम यांनी मंजूर केला आहे. नवीन उपनगराध्यक्ष कोण होणार? याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेमध्ये मागील पंचवार्षिकला सत्तांतर झाले. काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपाची एकमुखी बहुमतांनी सत्ता आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सत्यजित कदम हे निवडून आले. त्यावेळी भाजपा पक्षश्रेष्ठींनी उपनगराध्यक्षपदाची धुरा प्रकाश संसारे यांच्याकडे सोपविली. संसारे यांनी ही जबाबदारी गेली चार वर्षे अत्यंत चांगल्याप्रकारे सांभाळली. चारवर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी नगराध्यक्षांच्या खांद्याला खांदा देऊन विकासकामात सहभाग घेऊन मोलाचे सहकार्य केले. तळागळातील व गोरगरीब नागरिकांसाठी असणार्‍या शौचालय व घरकूल योजनेत मोठे काम केले.

यावर्षी साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून संसारे यांनी नगराध्यक्ष कदम यांच्याकडे राजीनामा सादर केला. त्यांनी तो मंजूर केला.

उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे म्हणाले, माझे वडील कॉ. मार्शल संसारे हे सर्व परिचित होते. त्यांच्या मानाने मी नवखा होतो. परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीवर माजी आमदार चंद्रशेखर कदम व भाजपा पक्षश्रेष्ठींनी उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी टाकून तळागाळातील सामान्यांना न्याय दिला. माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली. येथून पुढे देखील पक्षश्रेष्ठी टाकतील ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडील. नूतन उपनगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक तथा आदर्श नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चोथे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. चोथे यांना नगरपरिषद कामाचा मोठा अनुभव आहे. तसेच त्यांचा जनसंपर्क व मितभाषीपणा सर्वश्रृत असल्याने त्यांची निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक याचवर्षी होत असल्याने चोथे यांच्या निवडीला देखील महत्त्व प्राप्त होणार असल्याची चर्चा असली तरी निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे.

मी लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्याने उपनगराध्यक्ष संसारे यांचा राजीनामा मंजूर करण्याचा मला अधिकार आहे. त्या प्रमाणे तो मंजूर करून मुख्याधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. ते जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवतील. त्यानंतर दहा-पंधरा दिवसांत नवीन उपनगराध्यक्ष निवडण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या