मनमाड | प्रतिनिधी | Manmad
बँकेच्या विमा कंपनीचा (Insurance Company) प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने बँकेत (Bank) फिक्स डिपॉजिट ठेवणाऱ्या खातेदारांच्या खात्यातून कोट्यावधी रुपयांचा अपहार करून फरार झाल्याची धक्कादायक घटना युनियन बँकेच्या (Union Bank) मनमाड शहर शाखेत घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच फिक्स डिपॉजिट खातेदारांच्या तोंडचे पाणी पळाले असून त्यांनी बँकेत धाव घेऊन अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले.
हे देखील वाचा : Nashik News : महिनाभरात दोन कोटींचा मुद्देमाल जप्त
यावेळी खातेदारांनी जोरदार घोषणाबाजी करत बँकेचा परिसर दणाणून सोडला होता. तर ज्यांच्या रकमेचा अपहार करण्यात आला त्यात शेतकरी, सेवानिवृत्त कर्मचारी,व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. याप्रकरणी बँकेच्या मॅनेजरने तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) संशयित आरोपी संदीप देशमुख याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे बँकेच्या खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पेठरोडला चार ते पाच वाहनांची तोडफोड
याबाबत युनियन बँकेचे मॅनेजर अशोक जयराम सरोज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या सहा ते सात वर्षांपासून संदीप देशमुख (रा. चाळीसगाव) हा व्यक्ती बँकेच्या मनमाड शहर शाखेत बँकेच्या विमा कंपनीचा सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत होता. या व्यक्तीने बँकेत फिक्स डिपॉजिट ठेवणाऱ्या खातेदारांपैकी काहींच्या खात्यातून त्यांची रक्कम परस्पर काढून घेतली तर काहींचे पैसे खात्यात जमा न करता त्यांना बनावट फिक्स डिपॉजिटचे सर्टिफिकेट दिले.
हे देखील वाचा : Nashik Igatpuri News : मुंढेगावजवळ विहिरीत आढळला मायलेकींचा मृतदेह
यावेळी संदीप देशमुख याने १ कोटी ३९ लाख ६० हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी संदीप देशमुख विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोठ्या रकमेची फसवणूक करण्यात आली असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास नाशिक आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. सुरुवातीला सुमारे दीड कोटीचा अपहार झाल्याचे समोर आले. मात्र, आणखी अनेक खातेदारांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासाअंती फसवणूकीच्या रकमेत मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे देखील वाचा : Nashik News : मतदान करतानाचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी तरुण मतदारावर गुन्हा दाखल
एका खातेदारामुळे फुटले बिंग
सुभाष सांगळे हे शासकीय सेवेत कर्मचारी होते ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळालेले ४० लाख रुपये त्यांनी संदीप देशमुख यांच्यामार्फत युनियन बँकेत फिक्स डिपॉजिट केले होते. आज ते एफडी तोडण्यासाठी आले असता तुमच्या खात्यात पैसे नाही तुम्ही एफडी या अगोदरच मोडल्याचे त्यांना सांगण्यात आले ते ऐकून सांगळे यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांनी जेव्हा बँक मॅनेजरला फिक्स डिपॉजिटचे सर्टिफिकेट दाखविले तेंव्हा सर्टिफिकेट बनावट असल्याचे मॅनेजरने सांगितले. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सांगळे यांच्या पायाखालची वाळू सरकली. आयुष्यभराची असलेली पुंजी त्यांनी बँकेत ठेवली आणि आता बँक म्हणते की तुमचे पैसेच आमच्या बँकेत नाही. यानंतर सांगळे यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांना बोलवून सर्व घटना सांगितली. त्यानंतर फिक्स डिपॉजिट खातेदारांची फसवणूक झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर अनेकांनी बँकेत धाव घेऊन खात्री केली असता त्यांच्या खात्यातही पैसे नसल्याचे उघड झाले आणि एकच गोधळ उडाला. हा सर्व प्रकार दोन दिवसापूर्वीच बँक प्रशासनाच्या लक्षात आला होता. त्यामुळे त्यांनी मॅनेजर सह काही कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. एवढा मोठा घोटाळा अधिकाऱ्यांच्या लक्षात कसा आला नाही? असा प्रश्न खातेदारांनी उपस्थित करून यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हात तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.