Sunday, May 5, 2024
Homeजळगावचार महिन्यांपासून होमगार्ड मानधना पासून वंचित

चार महिन्यांपासून होमगार्ड मानधना पासून वंचित

फैजपुर, यावल – वार्ताहर Yaval

पोलीसांच्या खांद्याला खांदा लावुन कायदा व सुव्यवस्था राखणारे होमगार्ड यांची शासन हेळसांगळ करीत आहे. संपुर्ण देशात मार्च महिन्यापासुन कोविड -१९ या विषाणुजन्य आजाराने थैमान घातले असतांना आपल्या जिवाची पर्वा न करता कुटुंबाला वा-यावर सोडून पोलीसांसोबत जनतेची सेवा बजावणारे होमगार्ड यांना उपासमारीची वेळ शासनाने आणलेली आहे.

- Advertisement -

इतर सरकारी खात्यातील कर्मचारी यांचे वेळेवर पगार होत असुन निष्कामसेवा म्हणुन कार्यरत असणा-या फैजपुर सह जिल्ह्यातील इतर काही पोलीस स्टेशनच्या होमगार्ड जवानांना माहे जुलै नंतर कोणतेही मानधन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे सुमारे चार महिन्यापासुन होमगार्ड जवानांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असुन ब-याच होमगार्ड सैनिकांचे कुटुंब हे विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत.

ऐन दिवाळी सणामध्ये सुध्दा होमगार्ड यांना कोणतेही मानधन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरातील होमगार्ड यांची दिवाळी संपुर्णपणे अंधारात गेलेली आहे.

तसेच काही पोलीस स्टेशनकडील मानधन अदा करण्यात आलेले आहे. अनुदान प्राप्त झाल्यानंतर तुमचेसुध्दा मानधन अदा करण्यात येईल अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. तरी वेळोवेळी कायदा व सुव्यवस्थेसाठी शासनास कामात येणारे होमगार्ड कर्मचारी यांच्या वेल्फेअरकडे शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा निष्काम सेवा बजावणारा होमगार्ड सैनिक हा मानसिक दृष्ट्या कमकुवत होत जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या