Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय झाली चर्चा? तर्क-वितर्कांना उधाण

राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय झाली चर्चा? तर्क-वितर्कांना उधाण

मुंबई l Mumbai

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली. यावेळी त्यांनी दीड तास चर्चा केली. दोघांनी काही वेळ अँटिचेंबरमध्येही चर्चा केली. यावेळी मनसे आणि भाजप नेतेही उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

या भेटीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार ही चर्चा जोरात सुरू आहे. मनसेने राज्यसभेच्या निवडणुकीत तसंच विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. तसंच आता होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही एनडीएच्या उमेदवाराला म्हणजेच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. आता या सगळ्याच्या बदल्यात मंत्रिमंडळ विस्तारात मनसेला मंत्रिपद अपेक्षित आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

तसेच शिवसेनेला भगदाड पाडून राज्यात सत्ता मिळवल्यानंतर भाजपने आपले लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे केंद्रीत केले आहेत. त्यात मुंबई पालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची समजली जाते. शिवसेनेकडील हे एक महत्त्वाचे शक्तीस्थान आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे. मागील महापालिका निवडणुकीत मनसेमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले होते. सेनेचे हक्काचे मराठी मतदार मनसेकडे गेले होते. आगामी निवडणुकीतही याचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न आहे. मात्र, सध्या या सगळ्या शक्यता आणि अंदाज आहेत. आज फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान या भेटीनंतर बाळा नांदगावरकर म्हणाले की, मध्यंतरी राज ठाकरेंनीदेवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं होतं. ते पत्र सगळ्यांनाच आवडलं होतं. त्या पत्रानंतर फोनवरून दोन्ही नेत्यांचे बोलणं झाले होते. त्यानंतर आज ते सदिच्छा भेट घेण्यासाठी शिवतीर्थवर आले होते. १५-२० मिनिटं आम्ही दोन्ही नेत्यांसोबत होतो. या दोन्ही नेत्यांमधील चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कळू शकेल. मंत्रिमंडळातील समावेशाबाबत आम्ही माध्यमांकडूनच ऐकतो आहे. अमित ठाकरेंना मंत्रिमंडळात घेणार यावर राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. अशाप्रकारे वृत्त खोटं आहे. ही खोडसाळपणाचं होतं असं त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या