Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDCM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर 'या' खात्यांची जबाबदारी

DCM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर ‘या’ खात्यांची जबाबदारी

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. लोकभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला असून, महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्यपाल देवव्रत, मुख्यमंत्री फडणवीस, DCM शिंदेंची उपस्थिती

YouTube video player

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे खातेवाटपाचे पत्र पाठवले होते. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांना क्रीडा युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक व वक्फ विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अजित पवारांकडे असलेले अर्थ खाते मात्र त्यांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थ खाते कुणाकडे देतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

दरम्यान, विधानभवनातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज (शनिवारी) दुपारी २ च्या सुमारास आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवारांची एकमताने गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा गटनेते पदासाठी (Group Leader) प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मंत्री छगन भुजबळांनी,नरहरी झिरवाळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्व आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवारांच्या नावाला होकार दिला असता त्यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवारांनी लोकभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

हे देखील वाचा : Sunetra Pawar : सामाजिक कार्य, अजितदादांना राजकारणात खंबीर साथ ते पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; अशी आहे सुनेत्रा पवारांची राजकीय वाटचाल

ताज्या बातम्या

Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या भाजपला (BJP) मनपात स्पष्ट बहुमत असतांना त्यांनी शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सामील होण्याचा...