Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMalegaon Factory Election Result : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दणदणीत विजय; १०१ पैकी...

Malegaon Factory Election Result : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दणदणीत विजय; १०१ पैकी मिळाली तब्बल ‘इतकी’ मते

बारामती | Baramati

बारामतीमधील (Baramati) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Factory Election) बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहेत. या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटना अशी मिळून चार पॅनेल्स मैदानात आहेत. अशातच आता या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर माळेगावच्या सभासद आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय भवन बारामती येथे मतमोजणी (Vote Counting) पार पडत आहे. या मध्ये ब वर्ग प्रतिनिधीची मतमोजणी प्रारंभी झाली ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार (Candidate) होते. प्रथम ब वर्गासाठी मतमोजणी झाली. या वर्गात ९९ टक्के मतदान झाले होते. अपेक्षेप्रमाणे सर्व संस्थावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना १०१ पैकी तब्बल ९१ मते पडली आहेत. तर विरोधी सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना फक्त १० मते मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दणदणीत विजय झाल्याने सभासद व कार्यकर्ते यांनी आनंदोत्सव साजरा केला.

YouTube video player

माळेगावच्या निवडणूकीत निलकंठेश्वर, सहकार बचाव या पॅनेलसह राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल, शेतकरी कष्टकरी समितीचा पॅनेल रिंगणात आहेत. निवडणूकीत एकमेकांवर मोठे आरोप झाले. परंतु त्यात दोन्ही पवारांनी एकमेकांवर आरोप करणे टाळले. उपमुख्यमंत्री अजित पवार व तावरे यांच्यात मोठी जुगलबंदी रंगली. अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. अखेर निवडणुकीच्या निकालात (Result) अजित पवारांच्या पॅनेलची विजयाकडे वाटचाल होतांना दिसत आहे.

दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अ वर्गाची ८८.४८ टक्के मतदान झाले होते. यामध्ये १२ हजार ८६२ पुरुषांनी मतदानाचा (Voting) हक्क बजावला होता.तर ४ हजार ४३४ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तसेच १९ हजार ५४९ पैकी एकूण १७ हजार २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर ब प्रवर्गात ९९.०२ टक्के मतदान झाले होते. यात १०२ मतदारांपैकी ९९ पुरुष आणि २ स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...