Friday, May 17, 2024
Homeक्रीडापोलीस उपायुक्त बारकुंड यांना 'एस आर' किताब

पोलीस उपायुक्त बारकुंड यांना ‘एस आर’ किताब

नाशिक । प्रतिनिधी Nashik

600 कि.मी.ची बीआरएम सायकल राईड नाशिकचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड (Deputy Commissioner of Police Sanjay Barkund)यांनी अवघ्या 38 तासांत पूर्ण करून सुपर रॅन्डोनिअर (एस आर) होण्याचा मान मिळविला .

- Advertisement -

बीआरएम 600 कि.मी. सायकल राईडचे धुळे येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लांब पल्याच्या सायकलिंगचे लक्ष दिले जाते आणि ठराविक वेळ मर्यादा ठेवून ही अंतर पार करणे अनिवार्य असते . 200 ,300,400,600 कि.मी.च्या सायकलिंगच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते यासाठी वेळ मर्यादा ठरवून दिलेल्या असतात या वेळेत तेथे पोहोचणे आवश्यक असते.

600 कि.मी. ला साधारणपणे दर 100 कि.मी. वर एक चेकपॉईट असतो. चारही स्पर्धा सायकलिस्टने एका वर्षात पूर्ण केल्या तर त्यांना सुपर रॅन्डोनिअर (एसआर) असे संबोधले जाते.

बारकुंड यांनी नासिक सायकलिस्ट आयोजित 200, 300 व 400 तर कि.मी. भर पावसात पूर्ण केली होती. 600 किमी सुद्धा त्यांनी नासिक येथे रजिस्ट्रेशन होते मात्र कामाच्या व्यापामुळे ते त्यांना नासिक येथे शक्य झाले नाही , एसआर होण्यासाठी वर्षाच्या कॅलेंडरमध्ये शेवटचा महिना होता यासाठी संजय बारकुंड यांनी थेट धुळे गाठले व 15, 16 ऑक्टोबर रोजी 600 कि.मी.च्या स्पर्धेत भाग घेतला.

600 कि.मी. साठी वेळ मर्यादा 40 तास होती. या स्पर्धेची सुरूवात धुळे येथून झाली ठिकरी (मध्य प्रदेश)150 कि मी. पुन्हा धुळे 150 कि. मी. धुळ्याहून थेट नासिक आणि नाशिकहून पुन्हा धुळे असा 600 कि.मी. पूर्ण करण्याचे आव्हान होते. संजय बारकुंड यांनी सध्याचे ऑक्टोबर हिट आणि मान्सून वारा रात्रंदिवस सायकलिंग, 38 तासामध्ये एक-दोन तास झोप, अनेक समस्यांना तोंड देत ही स्पर्धा अवघ्या 38 तासांत पूर्ण केली .

संजय बारकुंड यांची सायकलिंग वैयक्तिक करत असत. मात्र, त्यांची भेट झाली सायकलिंगचा अवलिया किशोर काळे यांच्याशी संजय बारकुंड यांनी पहिली एनआरएम 100 कि. मी. केली तेथून त्यांची भरारी सुरू झाली. बीआरएम प्रथम 300 कि.मी. नाशिक ते धुळे (12 जुन 2022), 200 कि.मी. ( 31 ऑगस्ट 2022) नाशिक, येवला ,वैजापूर ,नाशिक पूर्ण केली, 400 कि.मी. (17 सप्टेंबर2022) नाशिक ते धुळे शिरपूर असा मार्ग होता.

भविष्यात 1000 कि.मी. एनआरएम व 1200 कि.मी. बीआरमएम विहित वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा देखील मानस संजय बारकुंड यांनी व्यक्त केला.एस आर झाल्यानंतर सर्व पोलीस विभागातील अधिकारी- अंमलदार, सामाजिक संस्था, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, सर्व क्रीडाप्रेमी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या