Friday, May 17, 2024
Homeधुळेतत्कालीन दुय्यम निबंधकाची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा

तत्कालीन दुय्यम निबंधकाची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा

धुळे । Dhule । प्रतिनिधी

येथील तत्कालीन दुय्यम निबंधकासह (Second Registrar) शासनाची (government) फसवणूक (Cheating) केल्याप्रकरणी पाच जणांवर (five persons) शहर पोलिसात गुन्हा दाखल (crime against) करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक तथा प्र. सह दुय्यम निबंधक गणेश राजेंद्र वारकर (वय 32 रा. यशवंत नगर, साक्री रोड, धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालयात चंचलबाई प्रफुल्लचंद नहार (वय 69), सुरेश प्रफुल्लचंद नहार (वय 48), शितलकुमार प्रफुल्लचंद नहार (वय 46), स्वप्नाली सुरेंद्र नहार (वय 45) व मिताली शितलकुमार शितलकुमार नहार (वय 42) रा. 36 बडगुजर प्लॉट, पारोळा रोड, धुळे यांनी कटकारस्थान केले.

धुळे येथील फायनल प्लॉट नं. 52-53 पैकी प्लॉट नं. 36 चे क्षेत्र 562 चौ.मी यास सिटी सर्व्हे नं. 1690/1 यात बांधलेल्या प्रेम पॅराडाईज अपार्टमेंन्ट या इमारतीतील स्टिल सेकंट प्लोअरवरील टेरेस प्लोअर नं. 403 चे क्षेत्र 40.90 चौ.मी ओपन टेरेस या मिळकतीचे खरेदी खत दस्त क्रमांक 1620/2019 दि. 19 डिसेंबर 2019 या दस्तामध्ये सुरेंद्र प्रफुल्लचंद नहार (रा. धुळे) यांचे नावाने असलेले बनावट व खोटे असे धुळे मनपाचे भागशः वापर प्रमाणपत्र सादर करून तत्कालीन सह दुय्यम निंबंधक वर्ग-2 यांची तसेच पर्यायाने शासनाची देखील दिशाभूल करीत फसवणूक केली. म्हणून वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या