नाशिक | प्रतिनिधी Nasik
नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन झाले.
गंगापूर रोड सारख्या उच्चभ्रू आणि निसर्गरम्य परिसरात घर घेण्याची इच्छा असलेल्या नाशिककरांसाठी हे प्रदर्शन सुवर्णसंधी घेऊन आले आहे. यावेळी ‘देशदूत’ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, ओजश्री सारडा, संपादक शैलेंद्र तनपुरे, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष तथा ठक्कर ग्रुप लिमिटेडचे (टिजीएल) संचालक गौरव ठक्कर, टीजीएलचे प्रोजेक्ट हेड नलीन शहा, तसेच दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची टीम आणि ब्रम्हेचा इस्टेटचे संचालक यांसह नामवंत बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. अमोल घावरे यांनी प्रास्ताविक केले.
गंगापूररोडसह, कॉलेजरोड, सिरीनमेडोज, आनंदवल्ली, पाईपलाईनरोड, धृवनगर परिसर, चांदसी, महात्मानगर आणि अन्य परिसरात घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. प्रदर्शनास मीडिया या जाहिरात एजन्सी व पपायाज् नर्सरीचे सहकार्य लाभले आहे. विकेंड आणि प्रजासत्ताक दिनाच्या सुट्ट्यांचे औचित्य साधून नाशिककरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
याप्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष कृणाल पाटील, रोहन इंटरप्राईजेसचे संचालक अविनाश शिरोडे, आदित्य डेव्हलपर्सचे संचालक अनंत ठाकरे, शिल्पा इस्टेटचे संचालक भाविक ठक्कर, पार्कसाईडचे मर्जीन पटेल यांसह देशदूतचे सहायक जाहिरात महाव्यवस्थापक (शहर) मिलिंद वैद्य, सहायक जाहिरात महाव्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणी, नावाचे प्रवीण चांडक, दिलीप निकम, शैलेश दगडे, शाम पवार, विठ्ठल राजोळे, गणेश नाफडे, प्रताप पवार, रवी पवार, विठ्ठल देशपांडे, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर समीर पाराशरे, भगवंत जाधव, आनंद कदम, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे यांनी परिश्रम घेतले. वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले तर आभार शैलेंद्र तनपुरे यांनी मानले.
प्रदर्शन सोमवार (दि. २६) पर्यंत ब्रम्हेचा इस्टेट, सावरकर नगर कॉर्नर, भोसला मिलिटरी कॉलेज समोर, गंगापूररोड येथे भरविण्यात आले आहे. टायटल स्पॉन्सर ‘दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ तर को स्पॉन्सर ‘ठक्कर ग्रुप लिमिटेड (टिजीएल)’ हे आहेत. एकाच छताखाली शेकडो गृह, व्यावसायिक प्रकल्प येथे बजेट होमपासून ते अतिशय आलिशान फ्लॅट्स, रो-हाउसेस, रो बंगलो, तसेच एन.ए. प्लॉट्सचे भरपूर पर्याय उपलब्ध असतील.
नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ठक्कर ग्रुप लिमिटेड (टिजीएल), पार्कसाईड रेसिडेन्सी, रोहन इंटरप्रायझेस, निशम डेव्हलपर्स, सेवा रियल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, साठे बिल्डर्स, की स्टोन कन्स्ट्रक्शन, आकार बिल्डकॉन, कोटकर ब्रदर्स, अर्बन साइट्स, अमित लाईफ स्पेस एलएलपी, ए.एम.आर. डेव्हलपर्स, अनंतारा, पूजा कन्स्ट्रक्शन्स, बी-ऑर्बिट ग्रुप, सी.डी.आय.एल.-फार्म प्लॉट्स, राजेंद्र बिल्डर्स, महाकाल बिल्डर्स, सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ऋषीराज बिल्डर्स, मिन्का रिव्हरडेल, नंदन बिल्डर्स, श्रीयोग बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री बालाजी डेव्हलपर्स, शिल्पा इस्टेट
नाशिकचे निसर्गसौंदर्य आणि येथील शांतता नेहमीच भुरळ घालणारी आहे. एकाच छताखाली नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प उपलब्ध करून देऊन ‘देशदूत’ने नाशिककरांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्तम व्यासपीठ निर्माण केले आहे. या प्रदर्शनामुळे ग्राहकांना घरांची निवड करणे अधिक सोपे होईल.
-मिलिंद गुणाजी
नाशिकच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये गंगापूररोड आणि लगतच्या परिसराला मोठी मागणी आहे. हे प्रदर्शन म्हणजे ग्राहक आणि विकासक यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. येथे केवळ घरेच नाहीत, तर आधुनिक जीवनशैलीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. सुट्ट्यांचे औचित्य साधून नाशिककरांनी या संधीचा लाभ नक्कीच घ्यावा.
गौरव ठक्कर




























































































