Monday, November 18, 2024
HomeUncategorizedदेशदूत काव्य कट्टा : माझे अस्तित्व

देशदूत काव्य कट्टा : माझे अस्तित्व

माझे अस्तित्व

एक क्षण का होईना तू मागे वळून बघावेस
पण फसव्या दुनियेच्या गर्तेत तू फसला गेलास

- Advertisement -

क्षणभर मागे बघण्याचा प्रयत्न ही तू टाळला
तितक्यात एक तारा चमकला, एक उजेड दिसला

माझ्या अंधकारमय जगात हा किरण आशेचा वाटला
कोसो दूर घेऊन गेला हा तुझ्या पासून मला

पण खरंच होता का हा किरण आशेचा वाटे मनाला
या फसव्या जगात मीच मग भूलत गेले त्याला

कित्येक फुटक्या लोभाने मन फुलत गेले
जखमा , व्रण, अपयश याने मनाला ग्रासले

तुझ्या शिवाय मी मग एकटीच पडले
आकाशातून पडले व मध्यावर अडकले

कित्येकांनी ओरबडले माझे अस्तित्व, माझे मीपण
कळेल का रे तुला तरीही मी अशी पण ?

– हेमलता खैरनार
मंगेशी धाम, कल्याण

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या