नाशिक । प्रतिनिधी Nashik
विविध श्रेणीतील अनेक नागरिकांच्या भेटीचा ओघ, उदंड प्रतिसाद हे ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो 2026’च्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. उद्या (दि.11) प्रॉपर्टी एक्स्पोचा समारोप होणार आहे.
‘देशदूत’ आयोजित तसेच ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायोजित ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो 2026’ मध्ये सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या ग्राहकांना विस्तृत माहिती देण्यात आली. ‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक नाशिकरोड येथील गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेले प्रसिद्ध ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेत. पर्यावरणीय पार्टनर पपायाज नर्सरी हे आहेत. सर्वांना एक्स्पोसाठी प्रवेश खुला आहे. नागरिकांनी दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रॉपर्टी एक्स्पो सारख्या प्रदर्शनांमुळे संभाव्य ग्राहकांशी थेट संपर्क साधणे शक्य होते, ज्यामुळे व्यवसायाला नवी गती मिळते. बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या ब्रँडची ओळख निर्माण होण्यास आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या प्रत्येक गृह-व्यावसायिक प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आधुनिक जीवनशैलीसाठी अनेक सोयीसुविधा दिल्या जातात. त्यामुळे ग्राहकांनी प्रॉपर्टी एक्स्पोमधील १३ ते १६ क्रमांकाच्या स्टॉलला नक्की भेट द्यावी जेणेकरून आमच्या विविध प्रकल्पांची माहिती मिळून आपल्या सोयीप्रमाणे प्रोजेक्ट व्हिजिट करणे ग्राहकांना सोपे जाईल.
-अभय जैन, संचालक ए.सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स



















































