कोहोर । वार्ताहर Kohor
पेठ तालुक्यातील आड बुद्रुक येथे विद्युत रोहित्र जळाल्याने गत आठ दिवसापासून वीज नसल्याने ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागली होती. याबाबत दैनिक ‘देशदूत’ने मागील आठवड्यात ‘विद्युत रोहित्र जळाल्याने गाव अंधारात’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करताच महावितरणने दखल घेत नवीन विद्युत रोहित्र उपलब्ध करुन तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत चालू केल्याने ग्रामस्थांनी दैनिक‘ देशदूत’चे आभार मानले.
पेठ तालुक्यातील आड बुद्रुक येथे आठ दिवसांपासून अर्ध्या गावात वीज नव्हती. त्यामुळे येथील अंधारमय भागात झाडे-झुडपाचे प्रमाण अधिक असल्याने जंगलातील वन्य प्राणी सावज शोधण्यासाठी अंधाराचा फायदा घेत गावात येत होते. यामुळे सर्व ग्रामस्थ भयभीत झाले होते. ही बाब महावितरणच्या अधिकार्यांना वेळोवेळी कळविण्यात आले.
लागलीच महावितरणने दैनिक ‘देशदुत’च्या बातमीची दखल घेत त्वरीत नवीन विद्युत रोहित्र बसविण्याबाबत मान्य केले. दि. 4 रोजी नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात आला. याबाबत दैनिक ‘देशदूत’च्या सततच्या पाठपुराव्यामुळे गावात वीजपुरवठा सुरळीत चालू करण्यात आला. याबबत आड बुद्रुक ग्रामस्थांनी दैनिक ‘देशदूत’, महावितरणचे अधिकारी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नंदुभाऊ गवळी यांचे आभार मानले.




