नाशिक | प्रतिनिधी Nashik
पंचवटी व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित व ‘हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि.’प्रायोजित ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो 2024’चा शानदार समारोप करण्यात आला. प्रदर्शनाच्या तीनही दिवस परिसरातील नागरिकांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली.
मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणाऱ्या प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘देशदूत’ वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली. फायनान्शियल पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र, तर पर्यावरणीय पार्टनर पपायज नर्सरी हे होते. बांधकाम व्यावसायिक संस्थांचे सुमारे 30 स्टॉल्स प्रदर्शनात मांडण्यात आले होते.
सहभागी झालेल्या स्टॉलधारकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. एक्स्पोला अंकुर पब्लिसिटीचे संचालक सुभाष गांधी, निर्मला गांधी या मान्यवरांनी भेट दिली. एक्स्पो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भगवंत जाधव समीर पाराशारे, आनंद कदम, विशाल जमधडे, प्रशांत अहिरे यांनी प्रयत्न केले.
नाशिककरांचे फॅमिली बिल्डर म्हणून नावलौकिक मिळालेले हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी ग्राहकांचा वाढता प्रतिसाद बघता, दिवाळीपर्यंत सुरू असलेली आपली ‘अपने घर का अपना त्योहर, एचएचबीडी होम फेस्ट’ ही ऑफर आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या अंतर्गत हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या प्रकल्पात घर घेतल्यास ग्राहकांना तब्बल 7 लाख रुपयांपर्यंतची बचत करता येणार आहे. तरी घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संचालक हर्षल हणमंते यांनी केले आहे. दिंडोरी रोड, गंगापूर रोड परिसरात त्यांचे दर्जेदार विविध गृह आणि व्यावसायिक प्रकल्प आहेत.
आयुष बिल्डकॉनच्या पंचवटी येथील प्रोफेसर कॉलनीच्या ‘गोकुळ हाईट’ या प्रकल्पातील 3 बीएचके फ्लॅटचे बुकिंग आज झाले. हा प्रकल्प अतिशय दर्जेदार असून, एकदा अवश्य भेट देऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन संचालक सुधीर देवरे यांनी केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा