दा नांग सिटी, व्हिएतनाम | विशेष प्रतिनिधी Da Nang City, Vietnam
भारतातील गुणवंत उद्योजकांचा सत्कार व्हिएतनाममध्ये होत असल्याने देशातील उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे. व्हिएतनामला येऊन ‘रायझिंग स्टार अवॉर्ड’ देण्याचा ‘देशदूत’ – ‘सार्वमत’ दैनिकांचा प्रयत्न स्तुत्य तर आहेच पण आमच्या देशाला सर्वप्रथम हा मान दिल्याबद्दल मी ‘देशदूत’ माध्यम समुहाचे विशेष आभार मानते, असे गौरवोद्गार व्हिएतनामच्या टुरिझम प्रमोशन सेंटरच्या उपसंचालक मिस माई थी तनहाय यांनी काढले.
‘देशदूत’ – ‘सार्वमत’तर्फे दिला जाणारा पहिला ‘रायझिंग स्टार अवॉर्ड’ सोहळा सोमवारी सायंकाळी दा नांगच्या समुद्रकिनारी असलेल्या नझारे हॉटेलमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी मिस तनहाय बोलत होत्या. भारत व व्हिएतनाम या दोन्ही देशात सध्या पर्यटनामुळे उत्तम संबंध प्रस्थापित झाले असून मुंबई, अहमदाबाद आदी शहरांमधून आता येथील महत्वाच्या शहरांमध्ये दररोज थेट विमानसेवा सुरु झाली असल्याचे अभिमानाने सांगितले.
मिस तनहाय यांच्या हस्ते चौदा जणांना स्मृतीचिन्ह देऊन गौेरवण्यात आले. याप्रसंगी खास कार्यक्रमासाठी अनेक नाशिककर आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘देशदूत’चे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी केले. सूत्रसंचालन व पाहुण्यांचा सत्कार सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी केला. सहायक जाहिरात महाव्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणी यांनी आभार मानले.
(कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत लवकरच प्रसिद्ध होईल)
यांचा झाला गौरव
- अॅड. डॉ. वैभव शेटे, नाशिक
- डॉ. नीलेश निकम, नाशिक
- शंकरराव वाघ, निफाड
- जयेश मेहता, मुंबई
- सुनील पाटील, दिंडोरी
- अमोल देशमुख, दिंडोरी
- सोमनाथ सोनवणे, दिंडोरी
- प्रतिक क्षत्रिय, सिन्नर
- अक्षय रमेश वडनेरे, नाशिक.
- अथर्व चिंतामणी, नाशिक
- श्रीरंग खुळे, सिन्नर
- वीरेंद्र नानासाहेब थोरात, अकोले,अहिल्यानगर
- रावसाहेब वाकचौरे, अकोले, अहिल्यानगर.
- गणेश सोपान मैड, लोणी, अहिल्यानगर




