Friday, May 3, 2024
Homeजळगावदेशदूत वारीचे अभंग...

देशदूत वारीचे अभंग…

पाऊस धावा

पाऊस धावा :

- Advertisement -

“””””””””””””””””””

सावळ्या विठ्ठला,

पाडना रे सरी.

भिजू दे पंढरी,

शेतातली.

शेतातली पीकं,

झाली बाबा रोड.

लागली रे ओढ,

पाण्यासाठी.

जन जनावर,

तरसली बापा.

थेंबासाठी धापा,

टाकतात.

येऊदे जराशी,

तुलाही कणव.

तूच नां प्रणव,

संसाराचा.

भना. म्हणे तुझी,

दाव ती मिरासी,

सांड रे जराशी,

चंद्रभागा.

© प्रा.बी.एन.चौधरी.

(९४२३४९२५९३)

- Advertisment -

ताज्या बातम्या