Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूज'त्या' टीकेनंतर देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा ताबा…

‘त्या’ टीकेनंतर देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा ताबा…

नागपूर | Nagpur
पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शाह यांचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी अहमद शाह अब्दाली असा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे,असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरमध्ये असून त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, . ‘उद्धव ठाकरे यांचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत नैराश्यात असल्याने अशा प्रकारचे शब्द वापरत आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती नैराश्यात असतो. तो व्यक्ती अशा प्रकारचं डोकं बिघडल्यासारखे बोलतो. त्याला फार उत्तर द्यायचे नसते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. ते औरंगजेब फॅन क्लबचे आहेत, हे त्यांनी आता दाखवून दिले आहे, अशीही टीका फडणवीसांनी केली.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : “अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे…”; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

उध्दव ठाकरे काय म्हणाले?
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील., माझ्यापायाशी कलिंगड ठेवले. काही जणांना वाटले मी त्यांना आव्हान दिले. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटाने चिरडले जाते. ते म्हणाले, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सचिन वाझेने मला पत्र पाठवल्याचं मी माध्यमातून ऐकलं आहे. मी ते पाहिलेलं नाही. कारण मी दोन दिवसापासून नागपुरात आहे. जे काही समोर येत आहे, त्याची चौकशी करू, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या