Wednesday, September 11, 2024
Homeनाशिकविकासाचा अनुशेष भरून काढणार : आ. पवार

विकासाचा अनुशेष भरून काढणार : आ. पवार

कळवण । प्रतिनिधी Kalwan

कळवण तालुक्यात (kalwan taluka) गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या (corona) प्रादुर्भावामुळे अनेक विकासाची आणि रस्त्यांची कामे (road work) मंजूर असून देखील निधी (fund) अभावी कामाला विलंब होत होता. तालुक्यातील अनेक रस्त्यांची आणि विकासाची कामे मंजूर झाली असून विकासकामे दर्जेदार करून तालुक्याच्या विकासाचा गेल्या काळातील अनुशेष भरून काढण्यात येईल अशी माहिती कळवणचे आमदार नितीन पवार (mla nitin pawar) यांनी दिली.

- Advertisement -

खर्डेदिगर गटातील 25 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन (Bhumipujan of development works), लोकार्पण प्रसंगी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार (Jayashree Pawar) होत्या. कळवण तालुक्यातील (kalwan taluka) खर्डेदिगर गटातील 25 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ, लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी ऑनलाईन (online) पद्धतीने कळवण येथील कार्यक्रमात केले होते.

आमदार नितीन पवार यांनी आज प्रत्यक्षात खर्डेदिगर गटातील विविध गावं, वाडया, वस्तीवर जाऊन विकासकामांचा प्रारंभ करुन ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकार्पण करुन ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्या. तालुक्यातील लखानीपाडा, मोहबारी, पाडगण, धार्डेदिगर, सुळे, जयदर, खडकी, कोसवन, सुपले दिगर, खर्डेदिगर, पुनंदनगर, काठरेदिगर, भैताणे, पिंपळे बु, सावरपाडा, मळगाव खुर्द, दह्याणे दिगर, हुंड्यामोख, गणोरे, देसराने, इन्शी, नाळीद, भांडणे येथील सभामंडप, अंगणवाडी, स्मशानभूमी शेड व रस्ता, गावं अंतर्गत रस्ता,

नळ पाणी पुरवठा योजना, सामाजिक सभागृह, रस्ता सुधारणा, गावतळे, बैठक व्यवस्था, सिमेंट बंधारा, रस्ता काँक्रिटीकरण, पीक अप शेड, पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्त्यावरील मोरी बांधकाम, रस्ता डांबरीकरण व सुधारणा करणे आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, ऋषिकेश पवार, राजेंद्र भामरे, पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ, सदस्य लालाजी जाधव, बाळासाहेब वराडे, सरपंच ज्ञानदेव पवार, संतोष देशमुख, हेमंत पाटील, मन्साराम ठाकरे, गंगाराम पाटील, रघुनाथ महाजन, सीताराम जाधव, गटविकास अधिकारी निलेश पाटील, डी. एम. गायकवाड, सोमनाथ सोनवणे, संतोष गावीत, रामदास चव्हाण, राजू पाटील, अनिल घोडेस्वार, संदीप पगार, सागर खैरनार, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या