Wednesday, October 16, 2024
HomeराजकीयDevendra Fadnavis : आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद, पण काहींसाठी ऐलान; फडणवीसांनी विरोधकांना खोचक...

Devendra Fadnavis : आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद, पण काहींसाठी ऐलान; फडणवीसांनी विरोधकांना खोचक टोला

मुंबई | Mumbai

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकालाचा गुलाल उधळला जाणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीची पत्रकार परिषद (Mahayuti Press Conference) आयोजित करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, निवडणुकीचा शंखनाद झालाय. अर्थात आमच्याकरता शंखनाद झालाय, काहींतरा ऐलान झाला आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, आमचा विरोधी पक्ष लाडकी बहीणी योजनेबाबात टीका करत असतो. पण एवढे पैसे आणणार कुठून. पण विरोधक असेही म्हणतात की आमचं सरकार आले तर १५०० चे २००० करू. आमचे सरकार आले तर कर्जमाफी करू. पण सरकारकडे या योजनांसाठी पैसे आहेत की नाही हे ठरवल पाहिजे. विरोधी पक्षच कन्फ्युज आहे. ते योजनाही जाहीर करत आहेत .पण बजेटमध्ये पैसेही नसल्याचे म्हणत आहेत.

तसेच, मला वाटतं त्यांचा पर्दाफाश झाला आहे. पण एक गोष्ट म्हणजे. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस नेते कोर्टात गेले आहेत. त्याना यश आलेले नाही. त्यांचे माजी मंत्री म्हणतात की ही योजना बंद करणार, त्या दिवशी उद्धव ठाकरे तर स्पष्टच बोलले की महायुतीच्या सगळ्या योजना आम्ही बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुळातच मागील अडीच वर्षे त्यांनी जशा सर्व योजनांवर स्थगिती आणली होती. तसेच आताही ते या योजनांवर स्थिगिती आणून महाराष्ट्राल कुलूप बंद कऱण्याचा यांचा प्रयत्न आहे. पण तो कधीही यशस्वी होणार नाही. असाही फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या