Saturday, June 22, 2024
Homeमुख्य बातम्याअमित शहांनी CRCS डिजिटल पोर्टलच्या उद्घाटनासाठी पुणे का निवडलं? फडणवीसांनी सांगितलं कारण

अमित शहांनी CRCS डिजिटल पोर्टलच्या उद्घाटनासाठी पुणे का निवडलं? फडणवीसांनी सांगितलं कारण

पुणे । Pune

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (शनिवारी) संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. त्यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा आहे. या दौऱ्यामध्ये अमित शहा यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ पोर्टलचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी या पोर्टलच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र निवडण्याचं कारण स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची भूमी ही सहकाराची भूमी आहे. आपल्याला कल्पना आहे की, पद्मश्री विखे पाटील, वैकुंठभाई मेहता धनंजय गाडगीळ यांनी महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. देशात सर्वाधिक सहकार ग्रामपातळीवर कुठे पोहचला असेल तर तो महाराष्ट्रत पोहचला आहे. सहारातून समृद्धी येऊ शकते अशी व्यवस्था राज्याने उभी केल्याने मोठं सहकार क्षेत्र राज्यात उभं झालं. हेच कारण आहे की अमित शाह यांनी सहकारिता मंत्रालय स्वीकारल्यानंतर नवीन कायदा करून देशात गावपातळीवर सहकार नेण्यासाठी व्यवस्था उभी केली. ती डिजीटल पोर्टलच्या माध्यमातून सर्वांना सुलभरित्या मिळाली पाहिजे यासाठी अधुनिक पोर्टल उभारलं. या पोर्टलच उद्घाटन दिल्ली किंवा गुजरातलाही करू शकले असते, पण खऱ्या अर्थानं सहकाराची पंढरी महाराष्ट्र आहे म्हणून अमित शाहांनी महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्हा निवडला, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, सहकार मंत्रालयाचे कामकाज हाती घेतल्यानंतर अमित शाह यांनी त्यामध्ये वेगाने बदल केले. आयकर संदर्भात प्रतिनिधी दिल्लीला जायचे आणि रिकाम्या हाताने परत यायचे. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही प्रतिनिधी मंडळ घेऊन शेतकऱ्यांवरील इनकम टॅक्ससंदर्भात शाहांना भेटलो. शाह म्हणाले शेतकऱ्यांना जास्त पैसे द्यायचे म्हणून इनकम टॅक्स लावायचा हे अतिशय चुकीचे आहे. हे मोदींजींच्या राज्यात मी चालू देणार नाही. त्यांनी हा इनकम टॅक्स रद्द तर केलाच शिवाय आधी ज्यांनी भरला होता तोही अॅडजेस्ट केला. हे काम कठीण होतं पण, अमित शाहांनी करून दाखवलं. कारण, त्यांचंही नेतृ्त्व सहकारातून घडलं आहे. त्यामुळे त्यांनी मार्ग काढत हा कर रद्द केला.

तसेच, अडचणीत असलेल्या कारखान्यांना एनसीडीसीच्या माध्यमातूनही मदत केली. शाहांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत, असे अजितदादा म्हणाले. हे खरंच आहे. पण आणखी पुढे सांगतो की त्यांचा जन्म मुंबईतला आहे म्हणजे त्यांची ही कर्मभूमी सुद्धा आहे. त्यावेळी राजकारण नसताना फॅक्ट्री चालवत होते ती फॅक्ट्री देखील महाराष्ट्रातच होती. असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या