मुंबई | Mumbai
बदलापूर (Badlapur) पूर्व येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. २० ऑगस्ट) सकाळपासून हजारो बदलापूरकर नागरिक (Citizen) रस्त्यावर उतरले आहेत.
तसेच पालकांनी या शाळेबाहेर आंदोलन देखील सुरू केले. तर काही नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूक रोखून धरत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यानंतर आता या घटनेवर राज्याच्या गृहमंत्र्यांनी (HM Devendra Fadnvis) पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत २ तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे हि वाचा : गौतमी पाटीलला दिलासा! अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी काय?
दरम्यान हि घटना सात दिवसांपूर्वी घडली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची नेआण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचे निलंबन केले आहे.
ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा अत्याचार झालेल्या एका चिमुरडीने आपल्या आईकडे गुप्तांगात त्रास होत असल्याची तक्रार केली. जेव्हा डॉक्टरांनी या चिमुरडीला तपासले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. तर, आपल्या अवघ्या साडेवर्षांच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून आता या घटनेची अखेर दखल घेण्यात आली आहे. याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला याबद्दल सांगण्यात आलं आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे हि वाचा : कोलकाता अत्याचार प्रकरण! डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, ममता सरकारलाही फटकारलं
“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते. आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी… बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहूलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजुने सगळा कायदेशिर भाग आम्ही निःशुल्क बघुत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊत. पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या.