Thursday, October 31, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis: अमित ठाकरेंना माहिममध्ये पाठिंबा? फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे ही सकारात्मक,...

Devendra Fadnavis: अमित ठाकरेंना माहिममध्ये पाठिंबा? फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे ही सकारात्मक, पण…

मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते, दादर-माहीम मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा असा सूर भाजपमधून उमटत आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी अशी ही मागणी होत आहे. अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासंदर्भात महायुतीची भूमिका काय आहे यासंदर्भात विचारणा केली. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक दिसून आले. त्यांचीदेखील मान्यता होती. परंतू, आपण उमेदवार न दिल्यास आपली मते ही शिवसेना ठाकरेंकडे जातील असे मत शिवसेनेतून व्यक्त करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी ते निवडणूक लढवतीलच असे निश्चित नसल्याचे सूचक संकेत फडणवीस यांनी यावेळी दिले. सदा सरवणकरां संदर्भात बोलताना, “सदा सरवणकर माघार घेणार का हे आम्ही बैठकीत ठरवू,” असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर आहे. तोपर्यंत होणाऱ्या बैठकी आणि चर्चांदरम्यान समजोता झाल्यास सरवणकर अर्ज मागे घेणार का हे अजून गुलदस्त्याच आहे.

सदा सरवणकर उमेदवारी मागे घेणार का?
सदा सरवणकर हे सध्या दादर-माहिम मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. सरवणकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत. सरवणकर यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी आणि अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असे भाजपमधील काही नेते आणि शिंदे गटातील काही नेत्यांनी मत व्यक्त केले. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत आम्ही निर्णय घेऊ.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या