मुंबई । Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुती भरघोस यश मिळालं आहे. एकट्या भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत तर महायुतीला तब्बल २३३ जागा मिळाल्या आहेत. अशावेळी आता महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी मोठी रस्सीखेच सुरु आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
- Advertisement -
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आता मुख्यमंत्रीपदी आरएसएस आणि भाजपकडून हायकमांडची पसंती असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांचाही फडणवीसांना पाठिंबा आहे. भाजपाच्या पाठिंब्यामुळे चार सहयोगी पक्षतील आमदार निवडून आले. विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे.