Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यादोन Video अन् आठ मुद्दे! ठाकरेंच्या 'कलंक'वर फडणवीसांचा पलटवार

दोन Video अन् आठ मुद्दे! ठाकरेंच्या ‘कलंक’वर फडणवीसांचा पलटवार

मुंबई | Mumbai

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन आता राज्याच्या राजकारणात नवा वाद सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल अमरावतीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जहरी टीका केली होती. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) अवस्था आहे. ते नागपूरला कलंक आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचे दोन व्हिडिओ आणि आठ मुद्दे त्यांच्या ट्वीटमध्ये टाकले आहेत. तसेच, “स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!,” असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

Crime News : शेतकऱ्याने केले नको ते धाडस, पोलीस पोहचले थेट शेताच्या बांधावर अन्….

फडणवीसांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय..?

उध्दव ठाकरेंनी नागपूर येथील भरसभेत फडणवीसांची ऑडिओ क्लिप ऐकवत खोचक टीका केली होती. त्याला फडणवीसांनी काँग्रेस(Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलेल्या ठाकरेंना आठ मुद्दे उपस्थित करत निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले, ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचबरोबर पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक! सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक! सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक! असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! पोलीस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक! कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक असल्याचं फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

VIDEO : “…पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही”; प्रसार लाड यांनी अरविंद सावंतांना दिली थेट ‘वॉर्निंग’

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या