Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारप्रकाशा येथील कार्तिकी स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

प्रकाशा येथील कार्तिकी स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पूनम चव्हाण

प्रकाशा |prakasha| दि.७-

- Advertisement -

वर्षातून एकदाच उघडणार्‍या येथील कार्तिकी स्वामींचे मंदिर आज कार्तिकी पौर्णिमेच्या पर्वावर भाविकांसाठी दुपारी ४.१५ वाजता खुले करण्यात आले. हजारो भाविकांनी आज कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. दरम्यान, उद्या दि.८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता मंदिर पुन्हा एक वर्षासाठी बंद करण्यात येणार आहे.

येथील कार्तिकी स्वामींचे मंदिर दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यत येते. आज कार्तिकी पौर्णिमा असल्याने दुपारी ४.१५ वाजता मंदिराचे कार्याध्यक्ष रमेश माळीच, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सरपंच राजनंदनी भिल, जि.प.सदस्य भारतीबाई अरुण मट्या भिल आदींच्या हस्ते कार्तिक स्वामी मंदिराचे द्वार उघडण्यात आले.

याप्रसंगी हजा रो भाविकांची उपस्थिती होती. दुपारपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यात महिला भाविकांची संख्या अधिक होती. मंदिरात यजमान, मानकरी, ट्रष्टी यांच्या हस्ते कार्तिक स्वामी, गणपती, शिवलींगाची पूजाअर्चा धार्मिक विधी करण्यात आली.

यावर्षी एक दिवस व दोन रात्र कार्तिक पौर्णिमेचे महत्व असल्याने त्या अनुषंगाने भाविकांना जास्त वेळ दर्शनासाठी मिळणार आहे. मंदिर उद्या रात्री १२ वाजता पुन्हा बंद करण्यात येणार आहे.

यानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण दिसून येत आहे. मंदिर परिसरात पूजेचे धामिर्क साहित्य, मोर पिसांचा बाजार भरला आहे. खेळणी, पालख्या यांनीसुध्दा दुकाने थाटली आहेत. एकलव्य सामाजिक गणेश मंडळाने भाविकांसाठी मोफत भंडारा प्रसाद वाटपाची व्यवस्था केली आहे.

धुळे येथील मिल्ट्रीचे सेवानिवृत्त देवेन्द्र युवराज हिरे यांनी सपत्नीक होमकुंडची हवन पूजा विधी केली. दिलीप भिल, राजेंद्र मिस्तरी, रमेश भिल, अंबालाल राजू भिल, पिंट्या भिल, कैलाश भिल, पुण्या भिल, शत्रूघ्न ठाकरे, पंकज सोनार, सुनील भिल, नवनाथ भिल, दीपक भिल, प्रवीण भिल, भगवान भिल, राहुल भिल, राज भिल, अरुण भिल, विलास भिल, मिलिंद खैरनार, बुरर्‍या भिल आदी भाविकांना सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

यावेळी सुनील संभु पाटील, रफिक खाटीक, अंबालाल कोळी, रामदास तुंबडू पाटील, ओंकार पाटील, राजाराम पाटील जयनगर, नंदलाल गिरीधर पाटील आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस अधिकारी, महिला पोलीस अधिकारी माया राजपूत सह सुमारे वीस पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस रामा पाडवी खंदारे, जाधव कोळी आदींनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त लावला आहे.

याप्रसंगी रामचंद्र पाटील यांनी सांगितले, कोरोनाचा काळ निघून गेल्यामुळे आता सर्वच मंदिरे खुली करण्यात आली आहेत. गेल्या सिहस्थ पर्वणीदरम्यान आम्ही या ठिकाणी भाविकांसाठी मंडप शेड उभारणीसाठी आर्थिक मदत दिली होती. अद्याप येथील काही सुधारणा बाकी आहेत. समाज मंदिर व उर्वरित विकासाचे कामासाठी ग्रामप्रशासन कटीबद्ध राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या