Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDhananjay Munde: अडीच कोटींची हत्येची सुपारी दिली? मनोज जरांगेंच्या आरोपांवर धनुभाऊंच प्रत्युत्तर;...

Dhananjay Munde: अडीच कोटींची हत्येची सुपारी दिली? मनोज जरांगेंच्या आरोपांवर धनुभाऊंच प्रत्युत्तर; म्हणाले, मी स्वत: कोर्टात…

बीड | Beed
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच रचण्यात आला असल्याचा आरोप जरांगे पाटील केला आहे. धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिलेली, अडीच कोटींची डील झाल्याचेही पाटील यांनी म्हटले होते. त्याच अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी परळी येथील जगमित्र कार्यालयातून पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले. आपण राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत आहे, अनेक लोक आपल्याला येऊन भेटतात? त्यामुळे केवळ अटक केलेले आरोपी मला भेटले म्हणून मी थेट हत्येचा कट रचला असे म्हणणे चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिले आहे.

यावेळी त्यांनी माझी आणि मनोज जरांगे यांची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी, यासाठी मी स्वत: कोर्टात जाऊन परवानगी घेऊन येतो, असेही धनंजय मुंडे म्हणाले. केवळ मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळावे, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये, अशी माझी मागणी आहे, यामुळे ते मला टार्गेट करत आहेत, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे. यावेळी मुंडे यांनी आरोपींनी केलेल्या कथित फोनवर देखील भाष्य केले.

- Advertisement -

मनोज जरांगेंचे उपोषणही मीच सोडले
मी 5 वर्षे विरोधीपक्ष नेते म्हणून काम केले, त्यावेळी मी मराठा आरक्षणासाठी सभागृह बंद केले. नगर जिल्ह्यातील कोपर्डीला मी पहिली भेट दिली, त्यावेळी आरोपीला अटक होईपर्यंत मी सभागृह चालू दिले नाही. बीड जिल्ह्यात 80 हजार कुणबी प्रमाणात मी वाटले. मनोज जरांगे यांचे उपोषणही मी सोडले आहे, 17 तारखेची सभा सोडली तर मी एकदाही त्याच्यावर आरोप केले नाहीत, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच, मनोज जरांगेना वाटते धनंजय मुंडे या पृथ्वीतलावर नसावेत. मराठा समाजाला ओबीसी की ईडब्लूएसमधून आरक्षण आहे, याचे उत्तर आणखी जरांगे यांनी दिले नाही. छत्रपती शिवरायांनी घालून दिलेली पद्धत लोक विसरत आहेत, आपल्याला सर्वांना एकत्र येऊन घडी पुन्हा बसवायची आहे, असेही धनंजय मुंडेनी म्हटले.

YouTube video player

तर याचा अर्थ त्यांना संपवण्याबाबत बोललो का?
“माझ्याकडे एकमेव फोन आहे. जो २४ तास सुरू असतो. मी तो चालू का ठेवतो? कारण माझ्या आजुबाजुला माझ्यावर ज्यांचा सगळ्यात जास्त विश्वास आहे. त्यांना कुठलीही अडचण आली तर ते आधी मला फोन लावतात. त्यांची कसलीही अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन सुरू ठेवतो. त्यांच्या अडचणी सोडवतो. अशात कुणी मला फोन केला आणि बोलले असतील तर याचा अर्थ मी त्यांना संपवण्याबाबत बोललो का? हे सगळं कशासाठी सुरू आहे ?, असा सवालही धनंजय मुंडेंनी विचारला.

माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा
या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी आहे. माझी ब्रेन मॅपिग, नार्को टेस्ट करा जरांगे आणि आरोपींचीही करा. मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांनाही अशा भाषेत बोलायचे ही पद्धत आहे का? असे धनंजय मुंडेंनी म्हटले. आज एआयने सर्व काही करता येते, मनोज जरांगे हे तुम्हाला सगळे महागात पडणार आहे, मला ठराविक जातीच्या व्यासपीठावरुन लाथा मारून बाहेर काढले होते, मराठा आरक्षणात 500 जणांचा जीव गेला, हे ईडब्लूएसमधून वाचले असते, असेही मुंडेंनी म्हटले.

सगळ्या गोष्टी महागात पडणार
“या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी महागात पडणार… कर्मा रिपीट्स…. जेवढं तुम्ही खोटं कराल, तेवढं खोटं तुमच्या विरोधात देखील फिरेल… एवढं लक्षात ठेवा, असा इशारा धनंजय मुंडे दिला. शिवाय अटक केलेले आरोपी हे जरांगे यांचेच कार्यकर्ते आहेत. तक्रार करणारे आणि आरोप करणारे, देखील सर्वच जण जरांगेंच्या जवळचे आहेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अग्निवीरांना शासकीय-निमशासकीय सेवेत संधी?

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना राज्याच्या शासकीय- निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळण्याची शक्यता...