Friday, May 3, 2024
Homeनगरधनगर आरक्षण : उपोषणकर्त्यांचा उपोषण सोडण्यास नकार

धनगर आरक्षण : उपोषणकर्त्यांचा उपोषण सोडण्यास नकार

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

चोंडी (ता. जामखेड) येथील धनगर समाज आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दुरध्वनीवरून संवाद साधला. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी उपोषणकर्त्यांना केली. मात्र जोपर्यंत आमच्या हातात आरक्षणाचा वटहुकुम पडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे सांगत उपोषणकर्त्यांनी त्यांना नकार कळवला आहे.

- Advertisement -

दरम्यान, आंदोलकर्ते आण्णासाहेब रूपनवर व सुरेश बंडगर यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी खास आरोग्य पथक सोमवारी चोंडी येथे पाठवले होते. या पथकाने सर्व उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केला. तर आ. राम शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा सुरू ठेवण्याची विनंती केली. आहिल्यादेवी होळकर स्मारकास्थळी सुरेश बंडगर यांच्यसह अक्षय शिंदे पाटील, माणिकराव दांगडे, गोविंद नरवटे, समाधान पाटील, नितीन धायगुडे, किरण घालमे, बाळा गायके यांचे आमरण उपोषण सुरू ते अधिक तीव्र करण्यासह राज्यभरात धनगर समाजाच्या पदाधिकार्‍यांनी राज्यातील प्रत्येक गावात तीव्र अंदोलने करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मिरीतील उपोषणकर्ते जिल्हा रुग्णालयात

नगर समाजाला अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमल बजावणी करा. या प्रमुख मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील विरभद्र मंदिरात राजूमामा तागड व बाळासाहेब कोळसे यांनी गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरु केले होते. दरम्यान उपोषणकर्ते राजूमामा तागड यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांनी देखील उपोषण सोडण्यास नकार दिला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंत्री महाजन आज करणार चर्चा

शासन धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शासनाच्यावतीने चर्चेसाठी चोंडी येथे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांना पाठवत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. महाजन हे आज मंगळवारी (दि.26) दुपारी पोहचणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या