Tuesday, December 10, 2024
Homeनगरधनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी ठिकठिकाणी आंदोलने

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी ठिकठिकाणी आंदोलने

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात सध्या ऐरणीवर असताना धनगर समाजाच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन छेडण्यात येत आहे,

- Advertisement -

त्याचाच भाग म्हणून अहमदनगर जिल्हा धनगर समाज संघर्ष समिती उत्तर विभागाच्यावतीने येथील तहसील कार्यालय याठिकाणी घोषणाबाजी करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल राऊत म्हणाले, धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करण्यात यावा. तसेच राज्य सरकारने दोन्ही सभागृहांमध्ये धनगर व धनगड हे एकच आहे असा ठराव करून केंद्र सरकारला पाठवावा,

केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून धनगर समाजाला आरक्षण द्यावे, पदोन्नतीसाठी पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात यावी, पोलीस मेगा भरती तत्काळ सुरू करावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनात तालुकाध्यक्ष चांगदेव नजन, रघुनाथ दातीर, ज्ञानदेव शेंडे , बापूसाहेब पवार , बळजो गोराणे , पांडुरंग गणपत शिंदे , सतीश लांडे , वेणूनाथ दातीर, विश्वजित राऊत, भाऊराव शिंदे , योगेश राऊत माधव दातीर, मुरलीधर दातीर, सुनील दातीर, महेश कांदळकर आदींनी सहभाग घेतला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या