पी.आर.हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
धरणगाव (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळ यात समतोल राखला तर त्यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होवू शकते. खेळातून संघभावना आणि खिलाडू वृत्ती वाढायला हवी असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय साॅफ्ट बाॅल खेळाडू सई अनिल जोशी यांनी केले. त्या येथील शतकमहोत्सवी पी.आर.हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. सई जोशी यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष डाॅ.अरुण कुलकर्णी, सचिव डॉ.मिलिंद डहाळे, मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी, उपमुख्याध्यापक एस.एम.अमृतकर, पर्यवेक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विद्यालयातील राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडू अंकित महाजन, कौशल पाटील, अंकित पाटील, जान्हवी पाटील, टीना नायर यांनी क्रिडांगणावर क्रीडा ज्योत मिरवत सभास्थानी आणली. सई जोशीसह मान्यवरांनी तिचे रोपण करुन उद्घाटन केले.
या निमित्ताने सई जोशी हिचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांशी हितगुज साधतांना तिने शालेय जीवनापासून खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे असा सल्ला दिला.
क्रिडांगणावर खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये संघर्ष करण्याची जिद्द, पराभव आणि विजय पचविण्याची क्षमता, सदृढ शरीर आणि तात्काळ निर्णय घेण्याची तल्लख बुध्दी सहज निर्माण होते असं ती म्हणाली. विद्यार्थ्यांनी एकच खेळ निवडून त्यात आपले प्राविण्य सिध्द करावे असा संदेश तिने दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी यांनी सई जोशीच्या क्रीडा नैपुण्याचे भरभरुन कौतूक केले व विद्यार्थ्यांना खेळभावना जोपासण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी, सुत्रसंचलन रोशनी शिंदे आणि कावेरी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडाशिक्षक एम. डी. परदेशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाय.ए. पाटील, डी. एच. कोळी, एन. वाय. शिंदे, प्रवीण तिवारी, नितिन बडगुजर, राजेंद्र पवार, वाय. पी. नाईक, मिलींद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे, सर्व शिक्षक यांनी परीश्रम घेतले.