धुळे – प्रतिनिधी dhule
तालुक्यातील बोरकुंड गटाच्या जि.प.सदस्या शालिनी भदाणे (Zilla Parishad Member Shalini Bhadane) यांच्यावर शाई फेक करीत त्यांच्या स्वीय सहाय्यकास मारहाण केल्याप्रकरणी काल रात्री शिवसेना (shivsena) जिल्हाध्यक्षांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालिनी भदाणे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल जि.प अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड झाली या निवडणूकीच्या कारणावरून
सायंकाळी जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) पुर्णाकृती पुतळ्याजवळ शिवसेना जिल्हाध्यक्ष अतूल सोनवणे, महानगराध्यक्ष धीरज पाटील व हेमा हेमाडे यांनी त्यांच्या अंगावर व डोक्यावर शाई फेकली, त्यामुळे त्यांच्या डोळयांची आग झाली.
तसेच त्याच्यासह स्वीय सहाय्यक अंकुश देवरे यास शिवीगाळ केली. तर देवरे यांना हाताबुक्यांनी मारहाण करीत दोघांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिघांवर भादंवि कलम 324, 323, 336, 337, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा झाला आहे. पुढील तपास पोलीस (police) करीत आहेत.