Sunday, November 24, 2024
Homeधुळेलाचखोर ग्रामसेवकास रंगेहात अटक

लाचखोर ग्रामसेवकास रंगेहात अटक

धुळे । प्रतिनिधी dhule

आत्याच्या जन्माची नोंद घेवुन जन्म दाखला देण्यासाठी लेट फीच्या नावाखाली 1 हजार 400 रूपयांची लाच घेतांना जामन्यापाड्यातील ग्रामसेवकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान धुळे एसीबीच्या (acb) पथकाची ही सलग दुसरी कारवाई आहे.

- Advertisement -

जामन्यापाडा (ता.शिरपुर) येथील रहीवाशी असलेल्या तक्रारदाराच्या आत्याचा जन्म दि.1 मे 1968 रोजी मौजे जामन्यापाडा येथे झाला असुन त्यांचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती. त्यामुळे तकारदार यांच्या आत्याची जन्माची नोंद होण्याकरीता तकारदार यांची आत्याने शिरपुर येथील मे. ज्युडीशिअल मॅजि. वर्ग 01 यांच्या न्यायालयात जन्माची नोंद होण्याकरीता फौजदारी किरकोळ अर्ज नं 472/2022 दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होवुन न्यायालयाने तक्रारदार यांच्या आत्याची जन्माची दप्तरी नोंद घेण्याबाबत दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी आदेश पारित केले आहेत. त्याप्रमाणे तकारदार यांनी आत्याच्या जन्माची दप्तरी नोंद होण्याकरीता दि.16 मे 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, जामन्यापाडा येथे जावुन न्यायालयाच्या आदेशांची प्रत जोडुन अर्ज ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांच्याकडे जमा केला होता.

त्यावेळी त्यांनी तकारदार यांना त्यांच्या आत्याच्या जन्माची नोंद घेवुन जन्म दाखला देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 1 हजार 400 रूपये लेट फीच्या नावाखाली लाचेची मागणी केली. याबाबत त्यांनी दुरध्वनीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयास माहिती दिली होती. त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने आज जामन्यापाडा येथे जावुन तक्रारदाराची तक्रार नोंदवुन घेतली. त्याअनुषंगाने केलेल्या पडताळणीदरम्यान ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या आत्याची जन्मांची नोंद घेण्यासाठी लेट फीच्या नावाखाली 1 हजार 400 रुपयांची लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम जामन्यापाडा ग्रामपंचायत कार्यालयात स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यादरम्यान ग्रामसेवक चौधरी यांना ताब्यात घेतेवेळी त्यांनी प्रतिकार केल्याने त्यांना सापळा पथकाने योग्य बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, रोहीणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या