Sunday, November 17, 2024
Homeमुख्य बातम्याफडणवीसांसोबत कुठेही चर्चेला तयार

फडणवीसांसोबत कुठेही चर्चेला तयार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

गेल्या 70 वर्षात काँग्रेसला जे जेमले नाही ते आम्ही पाच वर्षात करुन दाखवले, असे सांगणार्‍या राज्यातील भाजपचा मुखवटा कॅगच्या अहवालानंतर टराटरा फाटला आहे. जलयुक्त शिवाराच्या नावावर तब्बल…

- Advertisement -

9 हजार 634 रुपये खर्च झाले. यातून पाण्याची गरज तर भागली नाही पण भूजल पातळीही वाढली नाही, असे या अहवालात म्हटले आहे. मग नेमके पाणी मुरले कुठे? असा सवाल माजी आ. अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या श्री. गोटे यांनी आज प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उघड खुले आव्हान दिले आहे. त्यांच्या कारकीर्दीत राज्यात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चर्चा करण्यासाठी फडणवीस सांगतील त्या दिवशी, म्हणाल त्या चॅनलवर समोरासमोर चर्चा करण्यास तयार असल्याचे श्री. गोटे यांनी म्हटले आहे. दिवस आणि वेळही तुम्हीच ठरवा, असे ही त्यांनी पत्रकात नमुद केले आहे.

आपल्या 28 वर्षांची पत्रकारिता आणि अर्धशतकी राजकारणाच्या अनुभवात आपल्यावर कधी दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली नाही. मात्र कॅगच्या अहवालाने फडणवीस आणि त्यांच्या टोळीचा पडदाफास झाला असून जलयुक्त शिवार अभियान आणि पाटबंधारे खात्यातील भ्रष्ट्राचाराबात कॅगने ओढलेल्या ताशेरांवर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन श्री. गोटे यांनी या पत्रकातून केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या