Wednesday, April 2, 2025
Homeधुळेबँकेचा सायरन वाजल्याने उडाली खळबळ

बँकेचा सायरन वाजल्याने उडाली खळबळ

धुळे

शहरातील जमनालाल बजाज रोडवरील विजया बँक शाखेच्या बाहेरील सायरन अचानकपणे रात्री साडेनऊच्या दरम्यान जोरदारपणे वाजू लागल्याने परिसरात खळबळ उडाली. जोराने वाजत असलेल्या सायरनचा आवाज दूरपर्यंत गेल्याने आवाजाच्या दिशेने धावत आले बँके समोरील रस्त्यावर गर्दी जमा झाली. बँकेच्या आत कोणी शिरले आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला.

- Advertisement -

एका नागरिकाने हाकेच्या अंतरावर असलेल्या शहर पोलीस चौकीत निरोप दिला. बँकेजवळील सायरन वाजतोय. निरोप मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतु ते तिथे येऊन काही करू शकत नव्हते कारण फोन कोणाला करणार असा प्रश्न पोलिस समोर उभा ठाकला. बँकेच्या बाहेरील जागेवर कुठे जाहिराती फलकावर व कुठेच संपर्क नंबरच नाही.

यानंतर परिसरातील एक-दोन नागरिक तिथे आले ते म्हणाले की हा असा प्रकार रात्री-बेरात्री केव्हाही सूरु होतो. व तासनतास आवाज सुरूच राहतो. आमची झोपमोड होते. यानंतर पोलीसांनी बँकेचे शटरला एक धक्का दिला या नंतर दहा मिनिटानंतर बँकेचा सायरन बंद झाला. सायरन आवाज बंद झाल्याचे पाहून सुटकेचा निःश्वास सोडला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : श्रीरामपूरात दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर-नेवासा रोडवर काल विविध ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये पतीपत्नी तर एका डॉक्टराचा समावेश आहे....