धुळे । dhule प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात चोरट्यांनी कहर केला आहे. आज दि. 15 रोजी सकाळी तब्बल तीन महिलांच्या सोनपोत चोरट्यांनी लंपास केल्या. यामुळे महिला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत जाहीर केल्यापासून महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. याचाच चोरटे फायदा घेत आहे. बसस्थानकासह बसमधून प्रवासादरम्यान महिलांची सोनपोत व पर्समधील दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आज सकाळी चोरट्यांनीतीन महिलांच्या सोनपोत हातोहात लंपास केल्या. सकाळी 9.30 वाजता जयश्री शिवाजी निळे (वय 32 रा.पोलीस लाईन, धुळे) यांची चार ग्रॅमची सोनपोत चोरट्यांनी लांबविली. त्या धुळे-धमनार-साक्री बसने प्रवास करीत होत्या. तर अश्विनी भूषण खैरनार (वय 20 रा.मोहाडी) या अमळनेर-वापी बसने प्रवास करीत असताना त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोनपोत चोरी गेली आहे. तर तिसर्या घटनेत मनिषा भाऊसाहेब भोसले (वय 40 रा. लोंढे ता.चाळीसगाव) या महिलेचे तीन ग्रॅमचे मंगळसूत्र चोरीस गेले. त्या धुळे-धमनार-साक्री बसने प्रवास करत होत्या.