धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असून शुक्रवारी एकाचवेळी 208 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर धुळेे शहरातील त्रिमुर्ती कॉलनीतील 60 वर्षीय महिला, धुळ्यातील 64 वर्षीय पुरूष व वार (ता. धुळे) येथील 53 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
तिघांवर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 157 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 5 हजार 216 वर पोहोचली आहे. त्यापैकी तब्बल 3 हजार 459 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहे.
जिल्हा रुग्णालयातील 180 अहवालांपैकी 58 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात फागणे 3, दत्त मंदिर धुळे 1, महसूल कॉलनी साक्रीरोड 2, भोई गल्ली जुने धुळे 1, जीटीपी स्टॉप देवपूर 1, इंदिरा नगर वलवाडी 1, पवन नगर वलवाडी 1, आधार नगर वलवाडी 1, रमेश नगर चितोड 2, जापी 2, गल्ली नंबर 14 मध्ये 2, धनाई पुनाई कॉलनी 1, सोनगीर 5, कापडणे 1, कलमोड शिंदखेडा 2, दुध डेअरी रोड 1, धुळे इतर 8, नवलाने 3, गोंदूर 8, बाभूळवाडी 1, पद्मनाभ नगर साक्री रोड 4, मोची वाडा 1, रानमळा 1, नेर 2, रतनपुरा 2 व लळींगमधील एक रूग्ण आहे.
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 95 अहवालांपैकी 65 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शिंदखेडा 1, रामी 1, एकविरा कॉलनी 1, देसाई गल्ली 4, ओमप्रकाश नगर 1, मालपुर 3, लोहगाव 1, कार्ले 1, दाउळ 1, धमाणे 1, वरझडी 2, अंजन विहिरे 1, दलवाडे 1, पाथरे 3, वरपाडे 1, परासमाळ 8, सुरवाडे 1, दोंडाईचा राणीपुरा 1, आदर्शनगर 5, पंचवटी चौक 1, राऊळ नगर 5, गांधी चौक 1, आकाश विहार 3, आनंद नगर 1, चैनी रोड 3, महादेवपुरा 3, संत कबीरदास नगर 1, हुडको कॉलनी रोड 1, इंदावे साक्रीतील आठ रूग्णांचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 26 अहवालांपैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात सराफ बाजार 1, माळी गल्ली 1, शिरपुर 4, अर्थे 1, भटाने 1, वकील कॉलनी 1, होलनांथे 1 व सोनगीरातील एक रूग्ण आहे.
महापालिका पॉलिकेक्निक मधील 124 अहवालांपैकी 40 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात नागसेन नगर 4, हमाल मापाडी 1, मोहाडी 2, सुभाष नगर 7, बोरकुंड 1, सुदर्शन कॉलनी 1, कुमार नगर 1, देऊर 1, सत्य साईबाबा नगर 1, ग.नं. 14 जुने धुळे 7, येलमा मंदिर जवळ 1, स्नेहा प्रभा कॉलनी 2, स्वामीनारायण सोसायटी 5, सुभाष नगर 1, त्र्यंबक नगर 1, उत्कर्ष कॉलनी 1, मोराने 1, साक्री रोडवरील दोन रूग्ण आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 26 अहवालांपैकी 14 अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शिरपुर 2, आनंद नगर 1, मोहाड़ी 1, गांधी नगर 1, चितोड़ 2, कैलास नगर 1, शेलार वाड़ी 1, वलवाडी 1, देवपूर 1, धुळ्यातील तीन रूग्णांचा समावेश आहे.
खाजगी लॅबमधील 50 अहवालापैकी 20 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात तिरुपती नगर 1, अकबर चौक 1, झुलेलाल सोसायटी 1, विद्या नगरी 1, ग. द. माळी सोसायटी 1, राजेंद्र सूरी नगर 1, यशवंत नगर 1, शांतीनाथ नगर 1, भिवसंन नगर 1, न्हावी कॉलनी 1, राम नगर 1, नाटेश्वर कॉलनी 1, धुळे इतर 1, नगाव 1, नरडाणा 1, फागणे 1, आंबोडे 2, सोनगीर 1 व मुकटीतील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्हाची एकूण रूग्ण संख्या 5 हजार 216 वर पोहोचली आहे.