Sunday, May 19, 2024
Homeधुळेधुळे जिल्ह्यात 12 पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात 12 पॉझिटिव्ह

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 12 करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. एकुण रूग्ण संख्या 42 हजार 401 वर पोहोचली आहे.

- Advertisement -

जिल्हा रूग्णालयातील 63 अहवालांपैकी 0, धुळे तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपीड अँटीजन टेस्टचे 109 पैकी 1, शिरपूर उपजिल्हा रूग्णालय 21 पैकी 1, शिरपूर ब्लॉक रॅपिड टेस्टच्या 128 पैकी 0 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा 18 पैकी 1, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 216 पैकी 0, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 5 पैकी 0, रॅपिड टेस्टचे 144 पैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तसेच मोबाईल मेडीकल टिमचे 102 पैकी 0, मनपा सीसीसी 7 पैकी 2, मनपा युपीएचसी 302 पैकी 0, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 18 पैकी 0, एसीपीएम लॅबमधील 9 पैकी 5 व खाजगी लॅबमधील 14 पैकी 0 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या