Sunday, May 19, 2024
Homeधुळेधुळ्यात पुन्हा करोना रुग्ण संख्या शुन्य

धुळ्यात पुन्हा करोना रुग्ण संख्या शुन्य

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जुन महिन्याच्या सुरुवातीला कोरोना महामारीने जिल्ह्यात थैमान घातले आहे. परंतू आता दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत असून आज बुधवारी जिल्ह्यात एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास जिल्ह्यातून लवकरच कोरोना हद्दपार होईल.

- Advertisement -

जिल्ह्यात आतापर्यंत 42 हजार 445 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 668 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

अशी स्थिती असली तरी आता करोना रुग्ण संख्या गेल्या आठ दिवसांपासून घटली आहे. आज बुधवारी एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या