Friday, March 28, 2025
Homeधुळेधुळ्यात दरोडेखोरांची टोळी गजाआड

धुळ्यात दरोडेखोरांची टोळी गजाआड

धुळे –

शहरातील साक्री रोड परिसरात आज मध्यरात्री शहर पोलिसांच्या पथकाने दरोडेखोरांच्या टोळीला पकडले. त्यांच्याकडून पिस्टलसह दरोड्याचे साहित्य असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. साक्री रोड परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी कारला (क्र. एम एच 15- ईइ 0539) पकडले. कारमध्ये विजय उर्फ छंग्गा सरजीत बेंडवाल (वय २२ रा. जयभावनी रोड फर्नार्डीस वाडी,नासिक रोड नासिक), सत्तु भैरु राजपुत (वय २० मुळ रा.बडीसाजडी जि.चितोडगड (राजस्थान),ह.मु. रोकडोबा वाडी, जयभवानी रोड), राहुल अजय उज्जैनवाल (वय २० रा.जयभावनी रोड फर्नार्डीस वाडी,नासिक रोड नासिक), सुमित मनोहर अवचिते (वय २३ रा.कॅनल रोड, मगर चाळ, जेल रोड नासिक) व वाहन चालक इरफान नईम शेख (वय २४ रा.डिकले नगर,जेलरोड, संजेरी रो हाऊस नं.७ नासिक) हे मिळुन आले.

विजय आणि सत्तू याच्या कमरेस पँटमध्ये खोसलेले पिस्टल काडतुससह मिळुन आले. तर इतर तिघांकडून व कारमध्ये घातक शस्त्र सुरा व लोखंडी सळई, मिरची पुड, दोरी, बॅटरी, ४ मोबाईल व २ हजार ८२० रुपये रोख व कारसह ३ लाख ८२ हजार ८२0 रुपये असा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत ,अपर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ.,उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि हेमंत पाटील, शोध पथकाचे असई हिरालाल बैरागी, असई नाना आखाडे, पोहेकॉ भिकाजी पाटील, पोना सतिश कोठावदे, मुक्तार मंन्सुरी, संदिप पाटील, योगेश चव्हाण, बापु वाघ, पोकॉ/पकंज खैरमोडे, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, राहुल पाटील,अविनाश कराड, तुषार मोरे, विवेक साळुखे यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची कुऱ्हाडीने वार करत हत्या

0
जळगाव - jalgaon कुऱ्हाडीने सपासप वार करुन पतीने पत्नीची हत्या (Murder) केली. या घटनेत त्यांचा दहा वर्षांचा मुलगाही यात जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण...