धुळे dhule। प्रतिनिधी
धुळे ते दादर स्वतंत्र (Dhule to Dadar Railway) रेल्वे सुरू होण्याची उत्सुकता धुळेकरांना होती. ही उत्सुकता आता लवकच पूर्ण होत असून येत्या काही दिवसांतच या नविन रेल्वेचा शुभारंभ होईल. त्याबाबत रेल्वे विभागाने (Railway Department) नोटीफिकेशन (notification) अर्थात अधिसूचना जारी केली आहे, अशी माहिती खा.डॉ. सुभाष भामरे (MP .Dr. Subhash Bhamre) यांनी दिली आहे.
धुळे ते मुंबई अशी स्वतंत्र रेल्वेची अनेक वर्षांपासूनची धुळेकरांची मागणी खा. डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर पुर्ण झाली आहे. थेट धुळे रेल्वेस्टेशन ते मुंबई, दादर स्टेशनपर्यंत धावणारी रेल्वे सुरु करण्यास रेल्वेमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे. धुळे – दादर एक्सप्रेस आता धुळे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. आठवड्यातून तीन दिवस प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतल्यानंतर ही रेल्वे रोज धुळेकरांचा सेवेत राहील. याबाबत रेल्वे विभागाकडून आवश्यक ती तांत्रिक मंजूरीसह तयारी केली जात आहे.
लॉकडाऊन काळात बंद झालेली मुंबई बोगी धुळ्याकडे येणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. यामुळे प्रवाशांनी धुळे-मुंबई बोगीसाठी खा. भामरे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. खा. भामरे यांनी स्वतंत्र रेल्वेचीच मागणी लावून धरल्याने आणि तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाच्या अधिकार्यांकडून तयार करून घेण्यात आल्याने धुळे ते दादर अशी स्वतंत्र रेल्वे सुरू होण्यास रेल्वे बोर्डाचा हिरवा कंदील मिळाला आहे. ही रेल्वे प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून तीन दिवस आणि प्रतिसाद मिळू लागल्यावर रोज ही रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
खा.डॉ.सुभाष भामरे यांनी सातत्याने या रेल्वेसाठी प्रयत्न केल्याने धुळेकरांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. लवकरच ही रेल्वे सुरू होईल. धुळे ते मनमाड या लोहमार्गावर अनेक तांत्रिक अडचणी असल्याने हा प्रश्न खितपत पडला होता.
दरम्यान, मुंबईला जाण्यासाठी असलेली धुळेकरांसाठीची एक बोगीही बंद झाली होती. एका बोगीतून अधिकाधिक प्रवाशांना जाणे-येणे शक्य नसल्याने अपेक्षित समाधान मिळत नव्हते. यामुळे अनेक डबे असलेल्या थेट रेल्वेचा विचार पुढे आला आणि खा.डॉ.भामरे यांनी स्वतंत्र रेल्वेची मागणी लावून धरली होती.
खा. डॉ. सुभाष भामरे यांनी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाचे अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून धुळे-दादर अशी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी.अशी मागणी लावून धरली होती. यासाठी अनेकदा दिल्ली, मुंबई आणि भुसावळ या ठिकाणी चर्चा आणि बैठकाही झाल्या.अखेर या नव्या रेल्वेसाठीचे प्रस्ताव तयार करण्यात आले.
या प्रस्तावाला आता हिरवा कंदील मिळाला असून धुळे-दादर म्हणजेच मुंबई पर्यंतची ही रेल्वे धुळेकरांच्या सेवेत आता दाखल होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून तीन दिवस आणि अपेक्षित प्रतिसाद मिळू लागताच रोज धुळे – मुंबई आणि मुंबई अधिसूचना जारी धुळे असा प्रवास करण्यासाठी धुळेकरांना या रेल्वेचा लाभ घेता येणार आहे.
धुळे-मनमाड-इगतपूरी-दादर असा या रेल्वेचा प्रवास राहील, ती सुरू करण्याबाबतची अधिसूचना अर्थात नोटीफिकेशन रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात ही रेल्वे सुरू होणार आहे. आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धावेल. त्यात धुळे स्थानकावरून सकाळी 6.30 वाजता रेल्वे सुटेल आणि दुपारी साधारण 1.15 वाजता दादर येथे पोहचेल तसेच दादर येथून सायंकाळी 4.15 वाजता सुटेल आणि रात्री 11.30 वाजता धुळे स्थानकावर पोहचेल अशी माहिती प्राथमिक स्वरूपाची माहिती रेल्वे विभागाकडून प्राप्त झाली आहे.