धुळे – प्रतिनिधी dhule
जिल्हा नियोजन समितीची (District Planning Committee) बैठक शुक्रवार दि.28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector’s Office) नवीन नियोजन सभागृहात होणार आहे.
Visual Story श्रध्दा कपूरचा ट्रॅडिशनल लुकमिरची, पपई, केळीच्या निर्यातीसाठी शासन स्तरावरून उपाययोजना करा!
जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.
या बैठकीत 14 जानेवारी, 2022 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे व इतिवृत्ताच्या अनुपालनास मान्यता देणे, 31 मार्च, 2022 अखेरील जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण योजना, आदिवासी घटक कार्यक्रम व अनुसूचित जाती घटक कार्यक्रम) खर्चास मान्यता देणे, 30 सप्टेंबर, 2022 अखेर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण योजना, आदिवासी घटक कार्यक्रम व अनुसूचित जाती घटक कार्यक्रम) खर्चाचा आढावा, गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या लम्पी रोग नियंत्रणात आणण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी पुनर्विनियोजनाने उपलब्ध करून देण्यास मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा होईल, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी दिली आहे.