धुळे ।
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज लाल कांद्याची 2 हजार 200 गोणी तर पांढर्या कांद्याची 400 गोणी आवक झाली. लाल कांद्याला जास्ती जास्त 11 हजार रूपये क्विंटल तर सरासरी 7 हजार रूपये भाव मिळाला आहे.
- Advertisement -
गेल्या दोन महिन्यापासून कांद्याचे भाव तेजीत आहेत. कांद्याच्या वाढत्या भावाने मध्यवर्गीयांचा वांदा केला आहे.तर सध्या चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान आज येथील बाजार समितीत लाल कांद्याची 2 हजार 200 गोणी आवक झाली. त्याला कमी कमी 500 व जास्तीत जास्त 11 हजार रूपये व सरासरी 7 हजार रूपये क्विंटल भाव मिळाला.
तर 400 गोणी पांढर्या कांद्याची आवक झाली. त्याला कमीत कमी 700 रूपये व जास्तीत जास्त 8 हजार 800 रूपये व सरासरी 6 हजार रूपये भाव मिळाला.