Tuesday, May 21, 2024
Homeधुळेविविध घटनेत दोन युवतींची आत्महत्या

विविध घटनेत दोन युवतींची आत्महत्या

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोन युवतींनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटली आहे. याबाबत पोलिसात नोंद झाली आहे.

- Advertisement -

धुळे तालुक्यातील विश्वनाथ येथील रहिवासी अर्पिता सचिन पाटील (वय 19) या युवतीने काल दि. 2 रोजी राहत्या घरात किचन रूमध्ये स्लॅबच्या लोखंडी कडीला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.

तिला सोनगीर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत सोनगीर पोलिसात नोंद झाली आहे.

दुसर्‍या घटनेत अश्विनी संदीप पावरा (वय 16 रा. जोयदा ता. शिरपूर) या युवतीने दि. 2 रोजी राहत्या घरात काहीतरी विषारी पदार्थाचे सेवन केले.

तिला वडीलांनी शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत शिरपूर तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या