नाशिक | प्रतिनिधी Nashik
रंगाची मुक्तपणे उधळण करून उत्तर भारतीयांंनी आज नवीन नाशिक, सातपुर, देवळाली कॅम्प परीसरात मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली. एकमेकांना शुभेच्छा देऊन रंग लावला. गाण्यांच्या तालावर रंग खेळण्यात दंग झालेली मुले शहर परिसरात दिसत होती.
धुलीवंदनाचा सण महिला व बच्चे कंपनीचा आवडता असल्याने विविध कॉलनी, सोसायटीमध्ये महिलांनी एकत्रित येऊन रंगाचा आनंद लुटला. लहान मुलांनी आपल्या मित्रासह पिचकार्या तसेच कोरड्या रंगाची उधळण करून जल्लोष साजरा केला. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चौकाचौकात पोलिसां कडून बंदोबस्त होता.
जुन्या नाशिक मध्ये तीनशे वर्षांची परंपरा असलेया दाजीबा वीरांच्या मिरवणुका निघाल्या, सजवीलेलेे बालगोपाळ विविध वेशभुषा करुन मिरवणुकीत सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात वीर व त्यांचे नातेवईक मिरवणुकीत सहभागी झाले होते.
कोठेही अनुचीत घटना घडल्याचे वृत्त नव्हते. आता रविवारी साजर्या होणार्या रंंगपंचमीचे वेध नाशिककरांंना लागले आहे. त्यासाठी पाच ठिकाणी रहाडी खोदल्या जाणार आहेत.