Monday, April 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजTrain Accident : दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली; २ प्रवाशांचा मृत्यू

Train Accident : दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली; २ प्रवाशांचा मृत्यू

अनेक प्रवासी जखमी झाल्याची शक्यता

उत्तरप्रदेश

चंडीगड येथून आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा रेल्वे अपघात आज दुपारी उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे झाला.

- Advertisement -

चंडीगड येथून दिब्रुगडला जाणारी ट्रेन क्रमांक १५९०४ दिब्रुगड एक्स्प्रेस ही आज दुपारी २ च्या सुमारास गोंडा जंक्शन येथून पुढच्या प्रवासाला निघाली होती. मात्र काही गोंडापासून २० किमी अंतरावर या रेल्वेचा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू करण्यात येत आहे. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघाताची दखल घेतली असून मदतकार्याचे आदेश दिले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर

0
धुळे : राज्यात उद्योगांच्या माध्यमातून गुंतवणूक वाढण्यासाठी राज्य शासनाचे प्राधान्य आहे. या उद्योगांना आवश्यक त्या सोयीसुविधा व सवलती देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे. धुळयातील...