Thursday, November 21, 2024
Homeक्राईमसंगमनेरच्या वृध्द डॉक्टरची साडेअकरा लाखांची फसवणूक

संगमनेरच्या वृध्द डॉक्टरची साडेअकरा लाखांची फसवणूक

डिजीटल अरेस्ट प्रकरण || सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तुमचे मनीलाँडरींग केसमध्ये नाव आले आहे, तुमच्या विरूध्द सुप्रीम कोर्टाची अरेस्ट ऑर्डर व आरबीआयचे बँक अकाउंट फ्रिज करण्याचे आदेश असल्याने तुम्हास डिजीटल अटक झालेली आहे, असे म्हणत संगमनेर येथील एका वृध्द डॉक्टरला 11 लाख 50 हजारांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मोबाईल नंबरधारक विशाल सिंग (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) व मुंबई पोलीस हेडकॉर्टर व्हॉटसअ‍ॅप नंबरधारक राजेश मिश्रा (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ही घटना घडली. मोबाईल नंबरधारक विशाल सिंग व मुंबई पोलीस हेडकॉर्टर व्हॉटसअ‍ॅप नंबरधारक राजेश मिश्रा यांनी फिर्यादीला तुमचे आधारकार्ड हे मोबाईल नंबरला लिंक आहे. त्यावरून अनेक लोकांना घाण मेसेज केलेले आहेत.

तसेच नरेश गोयल यांच्या मनीलाँडरींगच्या केसमध्येही तुम्ही सामील आहात, असे सांगून तुमच्या विरूध्द सुप्रीम कोर्टाची अरेस्ट ऑर्डर व आरबीआयची बँक अकाउंट फ्रिज करण्याची ऑर्डर निघालेली असल्याने तुम्हास डिजीटल अटक झालेली आहे. तुमच्या खात्यातील 11.50 लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पाठवा, तुमचे पैसे तुम्हाला 48 तासांत चौकशी पूर्ण करून परत मिळतील, असे आरोपींनी त्यांना सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या