Monday, May 6, 2024
Homeजळगावमंद प्रकाश चंद्राचा, गोड स्वाद दुधाचा

मंद प्रकाश चंद्राचा, गोड स्वाद दुधाचा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

यंदा कोरोनाचे (Corona) निर्बंध नसल्याने उत्साह व उल्हासपूर्ण वातावरणात जळगावात घरोघरी तसेच कॉलन्यांमध्ये मंगळवारी कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri full moon) साजरी झाली. अनेकांनी आपआपल्या घराच्या गच्चीवरच चंद्राच्या शितल अन मंद प्रकाशाच्या साक्षीने दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून तसेच चंद्रदर्शन घेतल्यानंतर मसाले दुधाचा (Spicy milky) आस्वाद (Taste) घेत कोजागिरी साजरी (Celebration) केली.

- Advertisement -

दूधाचा तुटवडा जावणू नये म्हणून जिल्हा दूध संघांकडून नियोजन करण्यात आले होेते. त्यानुसार दोन लाख अतिरिक्त दूधाचा पुरवठाही दूध संघातर्फे जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर करण्यात आला होता.

दसरा आणि दिवाळीदरम्यान येणारी कोजागिरी पौर्णिमा ही खास मित्रमंडळी जमवून गप्पांच्या साथीने रात्र जागविण्याचे एक चांगले निमित्त असते. कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे रात्री दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखविणे आणि मग ते दूध पिणे. चंद्र हा शीतल आणि आल्हाददायक गोष्टींचे प्रतीक असल्याने त्याची पूजा करणार्‍यांनाही चंद्रासारखी शीतलता मिळते असे मानले जाते. त्यामुळे चंद्राच्या पूजसेह कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर अनेकांकडून घरी सत्यनारायणाची पूजाही करण्यात आली.

गीतांच्या तालावर धरला ठेका

यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्याने नागरिकांमध्ये कोजागिरीचा अपूर्व उत्साह होता. ठिकठिकाणी मिनी पार्ट्यांचे आयोजन करुनही कोजागिरी साजरी करण्यात आल्याचे पहावयास मिळाले. तर काही ठिकाणी महिलांनी एकत्र येत गाणे म्हणत कोजागिरी साजरी केली. गीतांच्या तालावर काहींनी ठेका धरत आपला आनंद साजरा केल्याचेही दिसून आले.

दूध आटवितांना त्यात चंद्राचे प्रतिबंब दिसल्यावर, चंद्राला नैवद्य देत मनसोक्त केशर, काजू, बदाम मिश्रित आटविलेल्या दूध पिण्याचा मनसोक्त आनंद लुटला. नियोजनानुसार जिल्हा दूधसंघाकडून जिल्ह्यात तसेच बाहेरील जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार दूधाचा पुरवठा करण्यात आला. कोणत्याही ठिकाणी दूधाचा तुटवडा जाणवला नाही.

सोशल मीडियावर कोजागिरी निमित्ताने शुभेच्छांचा पाऊस पडला. अनेकांनी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, इन्स्टाग्रामद्वारे आप्तस्वकियांपर्यंत कोजागिरीच्या शुभेच्छा पोहचविल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या