Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकदिंडोरी : औद्योगिक वसाहतीत करोनाचा शिरकाव

दिंडोरी : औद्योगिक वसाहतीत करोनाचा शिरकाव

लखमापूर। वार्ताहर Dindori / Lakhmapur

दिंडोरी तालुक्यात कोरोनाने आपले रौद्र रूप दाखविले असल्यामुळे दिवसेंदिवस करोना चे रुग्ण वाढत आहे. आणि आत्ता वैद्येकिय अधिकारी यांचे कडून मिळालेल्या माहितीनुसार लखमापूर औद्योगिक वसाहतीतील हेक्सागॉन केमिकल कारखान्यात एक करोना संक्रमित रुग्ण आढळला असून एव्हरेस्ट इंडस्ट्रीज कंपनी मध्ये सहा रुग्ण आढळले असून अवणखेड येथील पॉलीजन्टा कंपनित ३ रुग्ण आढळलेअसल्याने खळबळ उडाली आहे. हे कर्मचारी नाशिक येथून कंपनीत कामावर येत होते.आरोग्य विभाग यांचेकडून कारखान्यांना बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे वैद्यकिय अधिकारी डॉ .कोशिरे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे. एक काळ कोरोना मुक्तीसाठी आघाडीवर असणारा दिंडोरी तालुका आता कोरोना ने जवळ जवळ पास बऱ्याच टक्क्याने व्यापला आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोरोना मुक्त म्हणून दिंडोरी तालुक्याला ओळखले जात होते. परंतु आता मात्र जिल्ह्यात रग्णाबरोबर मृत्यू आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आसून . कोरोना चा बंदोबस्त करण्यासाठी दिंडोरी तालुक्याने सर्व प्रथम आठवडे बाजार बंद करणारा पहिला तालुका हा दिंडोरी तालुका होता .

या तालुक्यात कडक उपाय योजना सर्वच ठिकाणी केल्या होत्या . सर्व शासनाने दिलेले लाॅक डाऊन चे नियम तालुक्याने काटेकोरपणे पाळून सुद्धा आता केविड १९ म्हणजे कोरोना या साथीच्या रोगामध्ये तालुक्याचे नाव जिल्ह्यात अग्रेसर होत असल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील प्रशासन वर्गाची व तालुक्यातील नागरिकांची ञेधा तिरपट उठाली आहे.

अगोदरच्या काळात गावात जर एखादा रग्ण सापडला तर ते गाव लाॅक डाऊन च्या नावाखाली सील केले जात होते. परंतु आता मात्र गावात चार ते पाच रग्ण तसेच कोरोना रग्ण मृत्यू होऊनही गाव लाॅक डाऊन च्या नावाखाली सील होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना ने आपले बस्तान जास्त प्रमाणात बसविले आहे. असे तालुक्यातील नागरिकांमधून बोलले जात आहे.

तालुक्यात कोरोना फैलावांची मुख्य कारणे, जनता मनमानी पध्दतीने घरांच्या बाहेर पडत असुन सोशल डिस्टंन्सचा वापर करीत नसल्यामुळे रग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. सरकारी यंत्रणा दिवसेंदिवस जनतेकडे काना डोळा करीत राहिल्यामुळे नागरिकांनी कोरोना कडे साध्या पद्धतीने पाहिल्यामुळे कोरोना चा फैलाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत गेला.

दिंडोरी तालुक्यात सध्याच्या मितीला कोरोनाची रुग्ण संख्या ही १२६ च्या वर जात आहे. तालुक्यातील कोरोना संशयित रग्णाची उपचारासाठी पिंपरखेड, बोपेगाव या दोन ठिकाणंच्याड शासकीय आश्रम शाळेत सोय केलेली आहे. परंतु दिवसेंदिवस तालुक्यातील रग्णाची संख्या वाढत असल्यामुळे ही दोन्ही ठिकाणी कमी पडतील. असे भाकित व्यक्त केले जात आहे.

आरोग्य विभागा तर्फे तालुक्याच्या जवळ जवळ बहुतेक गावांमध्ये उपाययोजना म्हणून वेळोवेळी औषध फवारून निजर्तुकिकरण करण्यात येते.शासकीय यंत्रणा तसेच गाव पातळीवर ग्रामपंचायत मार्फत सर्व प्रयत्न केले जातात. परंतु जनतेच्या हलगर्जी पणा मुळे तालुक्यात कोरोना चा प्रसार होत आहे. ही चिंतेची बाब आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या