Tuesday, May 28, 2024
Homeमुख्य बातम्यादिंडोरी दर्पण पुरस्कार वितरण सोहळा : ‘देशदूत’चे कार्य कौतुकास्पद - कराळे

दिंडोरी दर्पण पुरस्कार वितरण सोहळा : ‘देशदूत’चे कार्य कौतुकास्पद – कराळे

दिंडोरी। प्रतिनिधी Dindori

दैनिक ‘देशदूत’ने समाजातील तळागाळात काम करणार्‍या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देवून त्यांच्या कार्याला शाबासकीची थाप दिली, हे नक्कीच उल्लेखनीय आहे, ‘देशदूत’चे कार्य हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले.

- Advertisement -

दिंडोरी ‘देशदूत’ विभागीय कार्यालयाच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त ‘देशदूत’ व ना. नरहरी झिरवाळ मित्र मंडळ यांच्या विद्यमाने दिंडोरी दर्पण पुरस्कार वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे आयोजन दिंडोरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवन, शिवाजीनगर दिंडोरी येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी दत्तात्रय कराळे बोलत होते. कराळे पुढे म्हणाले की, दैनिक ‘देशदूत’ने प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार दिला व तो पुरस्कार घेतांना पुरस्कारर्थींनी आपल्या सहकार्‍यांना तो पुरस्कार समर्पित करुन स्विकारला. हा नक्कीच त्यांच्या कार्याचा सन्मान असून या पुरस्काराचे हे वैशिष्ट्ये होते, असे ते म्हणाले.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनीही मनोगत व्यक्त करताना शेतीविषयी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील व्यवस्था व सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश झोत टाकला. यावेळी ‘देशदूत’ वृत्तसमुहाचे अध्यक्ष विक्रम सारडा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांंनीं केले.

यावेळी बाळासाहेब जाधव, प्रवीणनाना जाधव, वाळू जगताप, डॉ. मधुकर आचार्य, ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवडे, शरद मालसाने, योगेश बर्डे, डॉ. योगेश गोसावी, संतोष रहेरे, राजेंद्र उफाडे, कृष्णा मातेरे, शैलाताई उफाडे, अ‍ॅड. रत्ना जाधव, योगेश तिडके, मधुकर भरसठ, शुभम बोरस्ते, अ‍ॅड. गोरक्षनाथ चौधरी, अ‍ॅड. प्रदीप घोरपडे, विलास जाधव, जयदिप देशमुख, अनील चौघुले, योगेश मातेरे, अभिषेक देशमुख, किसनलाल बोरा, नीलीमा मोरे, सचिन वडजे आदींना दिंडोरी दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. मधुकर आचार्य, प्रवीण जाधव, योगेश बर्डे, किसनलाल बोरा यांनी आपल्या मनोगतातून ‘देशदूत’च्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय आदींसह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुषार वाघ यांनी केले तर आभार कार्यालयप्रमुख संंदीप गुंजाळ यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या