दिंडोरी | प्रतिनिधी
दैनिक देशदूत दिंडोरी विभागीय कार्यालयाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणार्या जीवन गौरव व दिंडोरी दर्पण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांना व आदिवासी कल्याणासाठी आयुष्यभर कार्य केल्याबद्दल सुरगाण्याचे माजी आमदार जे. पी. गावीत यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नवरात्रौत्सवात दांडिया टाळून महिला व भावी पिढीसाठी महिलांचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजन व संस्कृती संवर्धनाचे कार्य केल्याबद्दल दिंडोरीतील कोंगाईमाता भजनी मंडळाला दिंडोरी दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या मान्यवरांना मिळाले पुरस्कार
त्याच प्रमाणे दिंडोरी दर्पणचे विविध पुरस्कारही घोषित करण्यात आले आहे. दिंडोरीसह नाशिक जिल्ह्यात बेरोजगारांच्या प्रश्नावर लढा देणारे, शासनाच्या योजना घरोघरी पोहचविणारे शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांना दिंडोरी दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे. दिंडोरी शहराच्या तसेच तालुक्याच्या जलसंवर्धनात सहभाग घेतल्याबद्दल चंद्रकात राजे, दिंडोरी नगरविकासात उत्कृष्ट काम केल्याबद्दल नगरसेवक सुजित मुरकुटे, महिला प्रबधन तसेच समाजिक बांधिकलकी जोपासल्याबद्दल सौ. सोनल प्रदिप घोरपडे-देशमुख, उत्कृष्ट आरोग्यसेवा व सामाजिक कार्याबद्दल डॉ. शिल्पा विलास देशमुख यांना दिंडोरी दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून घडवून नोकरीस लावणाऱ्या प्रशिक्षक सागर वानखेडे व त्यांच्या अग्निपंख अकादमीस तसेच बांधकाम क्षेत्रात उद्योन्मुख व्यावसायिक म्हणून राहुल गटकळ, दिंडोरी शहरात संस्कृती संवर्धन, समाजप्रबोधन आणि गोरगरीबांना दिशादर्शन केल्याबद्दल प्रसाद दिंडोरकर, जोशी गुरुजी यांना दिंडोरी दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माजी जि. प. अध्यक्षा विद्याताई दत्तात्रेय पाटील यांनाही दिंडोरी दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे.
तसेच, कुपोषणग्रस्तांसाठी दिंडोरी पॅटर्न राज्यभर गाजवणारे व उत्कृष्ट प्रशासन सेवा दिल्याबद्दल राजेश देशमुख यांना तसेच वणी येथे चांगले शिक्षण दिल्याबद्दल किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कुलला दिंडोरी दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कार्याबद्दल प्रकाश कड वणी, उत्कृष्ट द्राक्ष क्षेतीबद्दल विलास कांगणे(नळवाडी), उत्कृष्ट आंबा शेतीबद्दल सौ. अमृता चौधरी-गांडोळे, उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल कृषी सहाय्यक प्रियंका कुडके, साक्षीताई राजेंद्र बागुल-मांदाणे, यांना दिंडोरी दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे.
Nashik News: दोन्ही सरकारी यंत्रणा; इमारत ताबासाठी तऱ्हा नाना!
यासोबतच, उत्कृष्ट युवा महिला उद्योजक म्हणून साक्षी पृथ्वीराज राजे यांना तर उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल पेठ येथील शेराभाई व सौ. सुनंदा घुटे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारार्थींचे अभिनंदन होत आहे.
शनिवारी (दि. १४) सायंकाळी ५ वाजता दिंडोरी येथील शिवाजीनगरातील राजे बँक्वेट हॉल येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी भूषण कापडणे व आज्ञा तुपलोंढे यांना गीतगुंजन हा गीतसंगीताचा बहारदार कार्यक्रमसुद्धा होणार आहे. कार्यक्रमास श्री. गोकुळभाऊ नरहरी झिरवाळ, युवा फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन देशदूत परिवाराने केले आहे.




