Wednesday, December 4, 2024
Homeनाशिकदिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे आहेत 'एवढ्या' संपत्तीचे मालक

दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे आहेत ‘एवढ्या’ संपत्तीचे मालक

नाशिक | Nashik

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवारांनी काल सोमवार (दि.२९) रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक लोकसभेसाठी (Nashik Loksabha) मविआकडून राजाभाऊ वाजे तर दिंडोरीसाठी भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातील दिंडोरीतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून याठिकाणी महायुतीकडून डॉ. भारती पवारांना (Dr.Bharati Pawar) उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भगरे विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.

- Advertisement -

मविआच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्यांनी निवडणूक अर्जासोबत त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? याबाबतचे एक प्रतिज्ञापत्र जोडले आहे. त्यामुळे आता मविआच्या दोन्ही उमेदवारांकडे किती कोटींची संपत्ती (Assets) आहे याची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजेंकडे (Rajabhau Waje) एकूण १५ कोटींची संपत्ती आहे. तर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या भास्कर भगरेंकडे (Bhaskar Bhagare) ६५ लाखांची संपत्ती असून त्यांनी २१ लाखांचे कर्ज देखील घेतले आहे.

दरम्यान, भास्कर भगरेंनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे चार तोळे व पत्नीच्या नावे १३ तोळे सोने असे एकूण १३ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने आहेत. तर ४३ लाख ७७ हजारांची जंगम (चल) मालमत्ता असून, २१ लाख ४१ हजारांची स्थावर (अचल) संपत्ती त्यांच्या नावावर आहे. तसेच भगरे यांच्याकडे तीन गाड्या आहेत. तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दहा लाख ३८ हजारांच्या ठेवी असून, निफाड तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेतही सात लाखांची ठेवींद्वारे त्यांनी गुंतवणूक केली आहे. याशिवाय सहा लाखांची एलआयसी पॉलिसी देखील त्यांच्या नावावर आहे. त्यासोबतच भास्कर भगरेंच्या नावे २१ लाख १७ हजारांचे तर पत्नीच्या नावे सव्वा तीन लाखांचे कर्ज असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या