Tuesday, October 22, 2024
Homeनाशिकदिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर; झिरवाळांच्या प्रयत्नांना यश

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर; झिरवाळांच्या प्रयत्नांना यश

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी येथील ३० खाटा क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाचे (Rural Hospital) १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार नरहरी झिरवाळ (MLA Narhari Zhirwal) यांनी यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले होते.

- Advertisement -

अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून दिंडोरी (Dindori) येथील ३० खाटा क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आले आहे. सदर श्रेणीवर्धीत रुग्णालयासाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करुन बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल असा शासन निर्णय जाहीर झाल्याने दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : जमिनीच्या वादातून अंगावर डिझेल ओतून वृध्दाला जिवंत जाळले

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात सेवा घेणार्‍यांची संख्या जास्त असल्याने सध्या ग्रामीण रुग्णालयात असलेले बेडची संख्या व आरोग्य मुबलक सुविधा मिळण्यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे (Dindori Rural Hospital) उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर व्हावे, अशी मागणी वारंवार होत होत. दिंडोरीकरांना आरोग्याच्या मुबलक सुविधांसाठी ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात होणारकेव्हा? असा सवाल वारंवार विचारला जात होता.

दिंडोरी तालुका हा आदिवासी तालुका आहे. दिंडोरी ग्रामीण रुग्णालय परिसरातील पेठ, सुरगाणा तालुक्यातील कामानिमित्त वास्तव्यास असलेले नागरिकही दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात सेवा घेण्यासाठी येत असतात. सेवा घेणार्‍यांची संख्या जास्त असल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात बेडची कमतरता भासते. दिंडोरी तालुक्यातून एका बाजूला सप्तशृंगी गडावर जाणारे भाविक व सापुताराला जाणारे पर्यटक तर दुसर्‍या बाजूने गुजरात महामार्ग असल्याने रहदारीचे प्रमाण जास्तच आहे.

हे देखील वाचा : Nashik News : सिटीलिंक बसच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडी ठार

एखादा अपघात (Accident) झाला तर पाहिजे त्या सुविधा वेळेवर मिळत नाही. जिल्हा रूग्णालयात पोहचेपर्यंत उशीर होतो. वेळेवर पाहिजे त्या सुविधा मिळाले नाही तर अपघातग्रस्तांना आपला जीव गमवावा लागतो.त्यामुळे दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणे आवश्यक होते . अखेर दिंडोरीकरांची प्रलंबित असलेली मागणी नामदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांनी पुर्ण झाली असून आता दिंडोरीकरांना आरोग्याच्या मुबलक सुविधा उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : म्हसरुळला भरदिवसा वृद्ध महिलेचा खून

वाढती लोकसंख्या आणि रहदारी या दृष्टिकोनातून आरोग्याच्या मुबलक सुविधा उपलब्ध होण्यासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि आज त्याला यश आल्याने मनस्वी आनंद होत आहे. मतदार संघातील नागरिकांना मुबलक आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी अजुनही काही मागण्या आहेत त्याचादेखील पाठपुरावा चालू असून त्यातदेखील लवकरच यश मिळेल असा विश्वास आहे.

नरहरी झिरवाळ, विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य

ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात व्हावे यासाठी मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा चालू होता. दिंडोरी करांना मुबलक आरोग्याच्या सोयी मिळाव्या या हेतुने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला. यात नामदार नरहरी झिरवाळ यांच्या विशेष सहकार्य आणि प्रयत्नातून आमच्या पाठपुराव्याला यश आला आहे. या निर्णयामुळे दिंडोरीकरांना आरोग्याच्या मुबलक सुविधा उपलब्ध होणार असल्याने मनस्वी आनंद होत आहे. यासाठी नामदार नरहरी झिरवाळ यांचे मी दिंडोरीच्या तमाम जनतेच्या वतीने अभिनंदन करून आभार मानतो.

कैलास मवाळ, माजी उपसभापती बाजार समिती दिंडोरी

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या